रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडला, सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, इमोशनल करणारा VIDEO
IPL 2024 : रविवारी वानखेडेच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा (MI vs CSK) 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने (MI) 186 धावांपर्यंत मजल मारली.
![रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडला, सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, इमोशनल करणारा VIDEO ipl rohit sharma emotinal video going alone to dressing room goes viral social media after ipl 2024 mi vs csk match रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडला, सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, इमोशनल करणारा VIDEO](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/15/4ad41f21809f45522bc2a50b149b513c1713184867011265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2024 : रविवारी वानखेडेच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा (MI vs CSK) 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने (MI) 186 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून रोहित शर्मानं (Rohit Sharma) एकट्यानं झुंज दिली. रोहित शर्माच्या शानदार शतकी खेळीनंतरही मुंबईला (MI) पराभवाचा सामना करावा लागला. हिटमॅनच्या आयपीएल करियरमधील हे दुसरं शतक ठरलं. चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामना संपल्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. या व्हिडीओच्या आधारावर रोहित शर्मा एकटा पडल्याचा दावा अनेकांनी केलाय.
सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू खिलाडूवृत्ती म्हणून एकमेकांची भेट घेत होते, त्यावेळी रोहित शर्मा निराश होऊन एकटा जात असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या निराशाजनक व्हिडीओनंतर नेटकऱ्यांमध्ये मतमतांतरे दिसत असल्याचे दिसतेय. एकीकडे दोन्ही संघाचे खेळाडू हात मिळवत होते, त्यावेळी रोहित शर्मा निराश होऊन ड्रेसिंग रुममध्ये जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शतकानंतरही मुंबईचा पराभव झाल्याची खंत रोहित शर्माच्या चेहऱ्यावर साफ दिसत होती. रोहित शर्माच्या चेहऱ्यावरील निराशा व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
@ImDrago45 pic.twitter.com/1mLrPoZqPO
— Rohit is the GOAT🐐 (@dranzertweets) April 15, 2024
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला लागोपाठ पराभवाचा सामना करावा लागत आहे. मुंबई इंडियन्सला सहा सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागलाय. मुंबईला घरच्या मैदानावरही पराभवाचा सामना करावा लागत आहे. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर विराजमान आहे. लागोपाठ पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमधील आशा अधीक कठीण होत चालल्या आहेत. रविवारी वानखेडे स्टेडियमवर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 206 धावांचा डोंगर उभारला होता. ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी शानदार अर्धशतकं ठोकली. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. मुंबईने ठरावीक अंतरानं विकेट फेकल्या. एका बाजूला रोहित शर्मा लढा देत होता, पण त्याला इतर खेळाडूंकडून साथ मिळाली नाही. त्यामुळेच रोहित शर्माच्या शतकी खेळीनंतरही मुंबईचा 20 धावांनी पराभव झाला.
मथीशा पाथिरानाची गेम चेंजर गोलंदाजी -
चेन्नईच्या विजयात वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना याचा सिंहाचा वाटा राहिला. पथिराना यानं मुंबईच्या महत्वाच्या चार फंलदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या पथिराना यानं चेन्नईला विजय मिळवून दिला. पथीराना यानं लयीत असणाऱ्या ईशान किशन याला सर्वात आधी बाद केले. त्यानंतर तिलक वर्मा यालाही बाद केले. मुंबईच्या फलंदाजांनी जेव्हा जेव्हा भागिदारी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा पथीराना यानं डाव हाणून पाडला. मथीशा पथिराना यानं 4 षटकांमध्ये 28 धावांच्या मोबदल्यात चार फलंदाजांना बाद केले. शानदार गोलंदाजी कऱणाऱ्या मथीशा पथिराना याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)