IPL 2022 Player Retention: अहमदाबादने खरेदी केले तीन खेळाडू, हार्दिक पांड्या कर्णधार
IPL 2022 Player Retention : लखनौ आणि अहमदाबाद या दोन आयपीएलमधील संघानी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
IPL 2022 Player Retention : लखनौ आणि अहमदाबाद या दोन आयपीएलमधील संघानी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. लखनौ संघाने राहुल, स्टॉयनिस आणि बिश्नोई यांना करारबद्ध केलं आहे. तर अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पांड्या, फिरकीपटू राशिद खान आणि शुभमन गिल या तीन खेळाडूंना करारबद्ध केलं आहे.
हार्दिक पांड्याकडे अहमदाबाद संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या आणि राशिद खान यांना अहमदाबाद संघाने प्रत्येकी 15 - 15 कोटी रुपये दिले आहेत. तर शुबमन गिल याला आठ कोटी रुपयात करारबद्ध केलं आहे. तीन खेळाडूंसाठी अहमदाबाद संघाने 38 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे या संघाकडे आता 52 कोटी रुपये शिल्लक आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे.
तुमच्या आवडत्या फ्रेंचायझीनं कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन?
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सुर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी)
चेन्नई सुपर किंग्ज- महेंद्र सिंह धोनी (12 कोटी), रविंद्र जाडेजा (16 कोटी), मोईन अली (8 कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (6 कोटी)
रॉयल चॅलेजर्स बंगळरू- विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी) आणि मोहम्मद सिराज ( 7 कोटी)
दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.50 कोटी) अॅनरिच नॉर्टीजे (6.50 कोटी)
सनराईजर्स हैदराबाद- केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)
कोलकाता नाईट रायडर्स- आंद्रे रसल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी) सुनील नारायण (6 कोटी)
पंजाब किंग्ज- मयांक अग्रवाल (12 कोटी), अशदीप सिंह (4 कोटी)
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (14 कोटी), जॉस बटलर (10 कोटी), यशस्वी जयस्वाल (4 कोटी)
लखनौ - केएल. राहुल(17 कोटी), मार्कस स्टॉयनिस(9.2 कोटी), रवि बिश्नोई (4 कोटी)