IPL 2023 Points Table : कोलकाताचा आरसीबीवर 'विराट' विजय, पॉईंट्स टेबलची स्थिती काय? ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाकडे?
IPL 2023 : आयपीएल गुणतालिकेत (IPL Points Table) सध्या गुजरात टायटन्स पहिल्या स्थानावर आहे. इतर संघांची परिस्थिती काय जाणून घ्या...
IPL Points Table 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) यंदाचा 16 वा मोसम आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये नऊ सामने खेळले गेले आहेत. नऊ सामन्यांनंतर गुजरात टायटन्स (GT) चार गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) पराभव केला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या संघाने आयपीएल 2023 हंगामात पहिला विजय मिळवला तर, आरसीबीचा या मोसमातील हा पहिला पराभव आहे.केकेआरने आरसीबीला हरवून गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. गुणतालिकेची स्थिती काय आहे ते जाणून घ्या.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) दोन सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सनंतर पंजाब किंग्सचा (PBKS) दुसरा क्रमांक आहे. पंजाब किंग्सनंही यंदाच्या मोसमातील दोन्ही सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स संघाकडे प्रत्येकी 4-4 गुण आहेत. पण चांगल्या नेट रनरेटमुळे गुजरात टायटन्स आघाडीवर आहे.
आयपीएल 2023 च्या नवव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 81 धावांनी पराभव केला. या विजयासह कोलकाताने पहिला विजय मिळवत पॉइंट गुणतालिकेत खातं उघडलं आहे. कोलकाता नेट रन रेट सध्या सर्वात जास्त 2.056 इतका आहे. पहिल्या विजयासह केकेआरने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आणि आता केकेआर तिसऱ्या स्थानावर आहे.
याशिवाय राजस्थान रॉयल्स (RR), लखनौ सुपर जायंट्स (LSG), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हे संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) मोसमातील त्यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षेत आहेत. या तीन संघांना अद्याप गुणतालिकेत खातं उघडता आलेलं नाही.
IPL 2023 Orange Cap, Purple Cap : ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाकडे?
चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड दोन सामन्यांत 149 धावा केल्यानंतर ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. लखनौ सुपर जायंट्सचा काईल मेयर्स 126 धावांसह या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दोन सामन्यांत 126 धावा केल्या आहेत. विराट कोहली दोन सामन्यांत 103 धावा करून चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन दोन सामन्यांत 97 धावा करून पाचव्या क्रमांकावर आहे. लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज मार्क वुड्सने दोन सामन्यांत आठ विकेट घेतल्याने त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. वरुण चक्रवर्ती आरसीबीविरुद्ध चार विकेट्स घेत एकूण सात बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑरेंज कॅप
ऋतुराज गायकवाड : 149 रन
कायल मायर्स : 126 रन
शिखर धवन : 126 रन
संजू सॅमसन : 97 रन
डेविड वॉर्नर : 93 रन
पर्पल कॅप
मार्क वुड : 8 विकेट
अर्शदीप सिंह : 5 विकेट
मोहम्मद शमी : 5 विकेट
नेथन एलिस : 5 विकेट
राशिद खान : 5 विकेट
महत्त्वाच्या इतर बातम्या :
लॉर्ड शार्दूलच्या वादळानंतर फिरकीचा तडाखा, कोलकात्याचा आरसीबीवर विराट विजय