IPL Mega Auction 2022: आयपीएल मेगा ऑक्शनचा आज दुसरा दिवस; तुमच्या आवडत्या संघाकडे शिल्लक रक्कम किती?
IPL Mega Auction 2022 Day 2: आयपीएलच्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळांडूवर पैशांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं.
![IPL Mega Auction 2022: आयपीएल मेगा ऑक्शनचा आज दुसरा दिवस; तुमच्या आवडत्या संघाकडे शिल्लक रक्कम किती? IPL Mega Auction 2022 Day 2, IPL 2022 Auction Live CSK, MI, DC, RR, RCB, SRH, LSG, GT, PBKS, KKR, IPL Mega Auction 2022: आयपीएल मेगा ऑक्शनचा आज दुसरा दिवस; तुमच्या आवडत्या संघाकडे शिल्लक रक्कम किती?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/13/991d2e15669c40de7b71a2d52d4b665f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL Mega Auction 2022 Day 2: आयपीएलच्या पंधराव्या हंगमातील मेगा ऑक्शनचा आज दुसरा दिवस आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळांडूवर पैशांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यासह गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जांयट्स यांनीही उत्कृष्ट खेळाडूंना खरेदी केलंय.
तुमच्या आवडत्या संघाकडं शिल्लक रक्कम किती?
1) चेन्नई सुपर किंग्ज- 20.45 कोटी
2) मुंबई इंडियन्स- 27.85 कोटी
3) दिल्ली कॅपिटल्स- 16.50 कोटी
4) कोलकाता नाईट रायडर्स- 12.65 कोटी
5) गुजरात टायटन्स- 18.85 कोटी
6) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- 9.25 कोटी
7) लखनऊ सुपर जायंट्स- 6.90 कोटी
8) राजस्थान रॉयल्स- 12.15 कोटी
9) पंजाब किंग्ज- 28.65 कोटी
10) सनरायझर्स हैदराबाद- 20.15 कोटी
ऑक्शन झालेल्या खेळाडूंची यादी-
1) चेन्नई सुपर किंग्ज- ड्वेन ब्रावो (4.40 कोटी), अंबाती रायडू (6.75 कोटी), रॉबिन उथप्पा (2 कोटी), दीपक चहर (14 कोटी), के.एम. असिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख)
2) मुंबई इंडियन्स- ईशान किशन (15.25 कोटी), डिवॉल्ड ब्रेवीस (3 कोटी), बसील थंपी (30 लाख), मुर्गन अश्विन (1.60 कोटी)
3) दिल्ली कॅपिटल्स- डेविड वार्नर (6.25 कोटी), मिशेल मार्शची (6.50 कोटी), शार्दुल ठाकूर (10.75 कोटी), मुस्ताफिजूर रेहमान (2 कोटी), कुलदीप यादव (2 कोटी), अश्विन हेब्बार (20 लाख), सरफारज खान (20 लाख), कमलेश नागरकोटी (1.10 कोटी), शिखर भारत (2 कोटी),
4) कोलकाता नाईट रायडर्स- श्रेयस अय्यर (12.25 कोटी), पॅट कमिंस (7.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डन जॅक्सन (60)
5) गुजरात टायटन्स- मोहम्मद शामी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरगनी (2.60 कोटी), राहुल तेवतिया (9 कोटी), रवीश्रीनिवासन साई किशोर (3 कोटी), नूर अहमद (30 लाख)
6) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- फाफ डू प्लेसीस (7 कोटी), हर्षल पटेल (10.75), वानिंदु हसरंगा (10.75 कोटी), दिनेश कार्तिक (5.50 कोटी), जॉश हेजलवूड (7.50 कोटी),
शाहबाज अहमद (2.40 कोटी), अक्षय दीप (20 लाख), अनूज रावत (2.40 कोटी)
7) लखनऊ सुपर जायंट्स- मनीष पांडे (4.60 कोटी), जेसन होल्डर (8.75 कोटी), दीपक हुड्डा (5.75 कोटी), कृणाल पांड्या (8.25), क्विंटन डी कॉक (6.75), मार्क वूड (7.50 कोटी), आवेश खान (10 कोटी), अंकित राजपूत (50 लाख), मार्क वूड (7.50 कोटी),
8) राजस्थान रॉयल्स- आर अश्विन (5 कोटी), ट्रेन्ट बोल्ट (8 कोटी), शिमरॉन हेटमायर (8.50 कोटी), देवदत्त पडीकल (7.50 कोटी), युजवेंद्र चहल (6.50 लाख), प्रसिद्ध कृष्णा (10 कोटी), रियान पराग (3.80 कोटी), के.सी करिप्पा (30 लाख)
9) पंजाब किंग्ज- शिखर धवन (8.25 कोटी), कगिसो रबाडा (9.25 कोटी), जॉनी बेयरेस्टो (6.75 कोटी), राहुल चाहर (5.25 कोटी), शाहरुख खान (9 कोटी), हरप्रीत ब्रार (3.80 कोटी), जितेश शर्मा (20 लाख), पी. सिंह (60 लाख), ईशार पोरल (25 लाख),
10) सनरायझर्स हैदराबाद- वॉशिंन्टन सुंदर (8.75 कोटी), निकलस पूरन (10.75 कोटी), टी नजराजन (4 कोटी), भुवनेश्वर कुमार (4.20 कोटी), प्रियम गर्ग (20 लाख), राहुल त्रिपाठी (8.50 कोटी), अभिषेक शर्मा (6.50 कोटी), कार्तिक त्यागी (4 कोटी), श्रेयस गोपाल (75 लाख), जगदीश सूचित (20 लाख),
अनसोल्ड प्लेयर-
डेव्हिड मिलर, सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकीब उल हसन, मोहम्मद नबी, मेथ्यू वेड, वृद्धमान साहा, सॅम बिलिंग्स, उमेश यादव, आदील रशीद, मुजीब रहमान, इमरान ताहीर, अॅडम झम्पा, आमित मिश्रा, रजत पाटीदार, अनमोलप्रीत सिंह, एस. हरी निशांत, मोहम्मद अजरुद्दीन, विष्णू विनोद, विष्णू सोळंकी, एन जगदिशन, मनीमरन सिदार्थ, संदीप लामिछाने.
हे देखील वाचा-
- IPL Auction 2022 : या खेळाडूंना मिळाली दहा कोटींपेक्षा जास्त रक्कम, ईशान किशनवर सर्वाधिक बोली
- IPL Auction 2022 : आवेश खानची कोटीच्या कोटी उड्डाणं, IPL इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप खेळाडू, लखनौने मोजले 10 कोटी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)