एक्स्प्लोर

IPL 2024 : जीव ओवाळून टाकेन, रोहित शर्मासाठी जीवाची बाजी लावेन : प्रीती झिंटा

Rohit Sharma captaincy : प्रिती झिंटाच्या  (Preity Zinta) पंजाब किंग्स  (PBKS)  संघाला मागील 16 वर्षांमध्ये एकदाची चषक उंचावता आला नाही.

Rohit Sharma captaincy : प्रिती झिंटाच्या  (Preity Zinta) पंजाब किंग्स  (PBKS)  संघाला मागील 16 वर्षांमध्ये एकदाची चषक उंचावता आला नाही. यंदाच्या हंगामातही पंजाबची कामगिरी साधारणच राहिली आहे. शिखर धवनच्या पंजाबला सहा सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आले आहेत, तर चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत पंजाबचा  (PBKS) संघ तळाला आठव्या क्रमांकावर आहे. संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सविरोधात पंजाबला तीन विकेटनं निसटता पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना प्रिती झिंटानं (Preity Zinta) रोहित शर्माबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंजाब किंग्सची मालकीन प्रिती झिंटा म्हणाली की, पंजाब किंग्ससाठी स्थिर आणि चॅम्पियन कर्णधाराची गरज आहे. सहकारी खेळाडूंचे मनोबल वाढवण्यात कर्णधाराचा मोठा रोल असतो. त्याशिवाय प्रिती झिंटा हिने रोहित शर्माबद्दल केलेल्या वक्तव्याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Rohit Sharma ला IPL 2025 लिलावात खरेदी करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यास Preity Zinta तयार - 

पंजाब किंग्सची मालकीन आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) म्हणाली की, पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा माजी कर्णदार रोहित शर्माकडे प्रत्येक टॅलेंट आणि क्षमता आहे, ज्याचा शोध पंजाबचा संघ घेत आहे. आयपीएल 2025 मध्ये रोहित शर्माला विकत घेण्यासाठी मी माझा जीवही धोक्यात घालू शकते. जर रोहित शर्मा कधी मेगा लिलावात उपलब्ध असेल तर प्रिती झिंटाला नक्कीच खरेदी करायचे आहे. प्रिती झिंटाने स्टार स्पोर्टसोबत बोलताना हा खुलासा केला. 

रोहित शर्मा मेगा लिलावात आल्यास त्याला खरेदी करण्यासाठी मी सर्वस्वी प्रयत्न करेल, त्यासाठी जीवही द्यायला तयार आहे.  आमच्या संघात फक्त एका कर्णधाराची उणीव आहे जो काही स्थिरता आणि चॅम्पियन मानसिकता आणू शकतो, असे प्रिती झिंटा म्हणाली. 
 

 
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई पाच वेळा चॅम्पियन - 

2013 मध्ये रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सची धुरा सोपवण्यात आली. त्याच हंगामात रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला चॅम्पियन केले. रोहित शर्माने 10 वर्षांमध्ये मुंबईला पाच वेळा आयपीएल जेतेपद मिळवून दिले. आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारामध्ये रोहित शर्माचं नाव घेतलं जातं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये चषक उंचावला. आयपीएल 2024 हंगामाआधी मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन बाजूला केले. सध्या मुंबीची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. हार्दिकला कर्णधारपद दिल्यानंतर चाहत्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्याशिवाय रोहित शर्मा 2025 मध्ये मुंबईची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. लखनौ, चेन्नई, दिल्लीसह पंजाब या संघापैकी एका संघामध्ये रोहित शर्मा जाऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे. अनेक दिग्गजांनी रोहित शर्माने मुंबईची साथ सोडून आपला मार्ग बदलावा असा सल्ला दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget