एक्स्प्लोर

रोहितचं कर्णधारपद का काढलं, हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीबाबात मोठा ट्विस्ट, सिद्धूच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

IPL Hardik Pandya Captaincy : आयपीएलच्या 17 व्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून टाकत हार्दिककडे धुरा सोपवली होती. पण चाहत्यांना ही गोष्ट रुचली नाही.

IPL Hardik Pandya Captaincy : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मैदानात उतरले आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून टाकत हार्दिककडे धुरा सोपवली होती. पण चाहत्यांना ही गोष्ट रुचली नाही. रोहित शर्माच्या समर्थकांनी हार्दिक पांड्याला हूटिंग तर केलीच, त्याशिवाय मुंबईच्या संघाला सोशल मीडियावर ट्रोल केले. वानखेडे स्टेडियमवर सोमवारी मुंबईचा सामना झाला. या सामन्यावेळीही हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. रोहित शर्माची जागा घेणाऱ्या हार्दिक पांड्याची जागा घेण्याच्या निर्णायावर चाहतेच नाही, तर माजी खेळाडूही अवाक झाले आहेत. रोहित शर्माची नेमकी चूक काय होती, की त्याला कर्णधारपदावरुन बाजूला केले? असा प्रश्न माजी खेळाडू नवजोत सिंह सिद्धू यांनी मुंबई इंडियन्सला प्रश्न विचारला.  भारताचा हिरो, भारताचा कर्णधार, आपल्या फ्रेंचायजीचा कर्णधार नाही, ही गोष्ट कुणालाच रुचली नाही.  रोहित शर्माची नेमकी चूक काय झाली? असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे, असे सिद्धू म्हणाले. 

रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याकडे मुंबई संघाची धुरा सोपवण्याबाबत फ्रेंचायजीला निशाण्यावर धरलं जातेय. अनेकांच्या मते, मुंबई इंडियन्सने मोठी चूक केली आहे. हार्दिक पांड्या आगामी टी 20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आशा चर्चा मागील काही महिन्यापूर्वी सुरु होत्या. दुखापतीआधी हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या टी 20 संघाची धुरा संभाळत होता. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकात हार्दिक पांड्याच भारतीय संघाची धुरा संभाळेल, असं म्हटलं जात होतं. आयसीसीने जारी केलेल्या पोस्टरमध्येही हार्दिक पांड्याचा फोटो होता. पण बीसीसीआय सचिव जय शाह यांनी विश्वचषकात रोहित शर्माचं नेतृत्व करणार असल्याचं स्टेसमेंट केले. त्यानंतर सर्व खेळ बदलला. 

नवजोत सिंह सिद्धू यांच्या मते, बीसीसीआयकडून रोहित शर्माबाबतची घोषणा आणखी आधी झाली असती, तर मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला कर्णधार केलेच नसते. सिद्धू म्हणाले की, "ऑक्टबर 2023 मध्ये जर बीसीसीआयकडून रोहित शर्मा टी 20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाची धुरा संभाळणार असल्याचं जाहीर केले असते. तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माबाबतचा निर्णय घेतलाच नसता. कारण, भारतीय संघाचा कर्णधारच आपल्या संघाचा कर्णधार आहे, असा विचार त्यांनी केला असता. हार्दिक पांड्याला ट्रेड केले नसते, अथवा कर्णधार केलेच नसते. " दरम्यान, सध्या मुंबईच्या संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे, तर भारताच्या तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार रोहित शर्मा आहे. 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akola Rada | अकोल्यातील हरिहर पेठमध्ये दोन गडात राडा, शहरात तणावाचे वातावरणSanjay Raut On Congress | स्वबळाचा काँग्रेसचा विचार असेल तर तसं जाहीर करा- संजय राऊतEknath Shinde On Ladaki Bahin Yojna : आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीयMajha Infra Vision Eknath Shinde | महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन काय? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
Rahul Gandhi : राऊत म्हणाले, जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर, तृणमूल म्हणते, अहंकार नडला; राहुल गांधी मोजक्याच शब्दात काय म्हणाले?
राऊत म्हणाले, जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर, तृणमूल म्हणते, अहंकार नडला; राहुल गांधी मोजक्याच शब्दात काय म्हणाले?
Uddhav Thackeray: जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
Embed widget