एक्स्प्लोर

मिचेल स्टार्क आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, क्षणात कमिन्सला टाकले मागे, चार संघामध्ये चुरस

IPL Auction 2024: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलाय.

IPL Auction 2024: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलाय. त्याने पॅट कमिन्स याला मागे टाकत हा विक्रम मोडीत काढलाय. पॅट कमिन्सला 20.50 कोटी रुपयात खरेदी केले होते. पण हा रेकॉर्ड अवघ्या अर्ध्या तासात मोडला गेलाय. मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना कोलकात्याने खरेदी केले. मिचेल स्टार्क सात वर्षानंतर आयपीएलमध्ये खेळत आहे. याआधी तो आरसीबी संघाचा सदस्य राहिलाय. 

मिचेल स्टार्कसाठी चार संघामध्ये बिडिंग टेबलवर लढत झाली.  मिचेल स्टार्कसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन संघामध्ये आधी लढत झाली. 10 कोटींपर्यंत बोली पोहचल्यानंतर दिल्लीने माघार घेतली. त्यानंतर कोलकात्याने रस दाखवला. मुंबईने माघार घेतली. पण त्याचवेळी गुजरातनेही रस दाखवला. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये स्टार्कसाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकात्याने स्टार्कला ताफ्यात घेतले. कोलकात्याने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले. 

आजवरचे सर्वात महागडे खेळाडू
पॅट कमिन्स - 20.50 कोटी, हैदराबाद, 2024
सॅम करन 18.5 कोटी  (पंजाब 2023)
कॅमरुन ग्रीन : 17.50 कोटी (मुंबई इंडियन्स 2023)
बेन स्टोक्स : 16.25 कोटी (चेन्नई 2023)
क्रिस मॉरिस : 16.25 (राजस्थान 2021)
युवराज सिंह : 16 कोटी (दिल्ली 2015)
निकोलस पूरन : 16 कोटी (लखनौ 2023)
पॅट कमिन्स : 15.50 कोटी (कोलकाता 2020)
कायले जेमिसन : 15 कोटी (आरसीबी 2021)
बेन स्टोक्स : 14.5 कोटी (पुणे 2017)

मिचेल स्टार्कचं आयपीएल करियर - 

मिचेल स्टार्क 2014-15 मध्ये आयपीएलमध्ये खेळला आहे. दोन हंगामात त्याने 17 सामने खेळले आहेत. त्यामधील 26 डावात गोलंदाजी करताना 34 विकेट घेतल्या आहेत. 15 धावा देऊन 4 विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. त्याची इकॉनॉमी 7.16 इतकी आहे. 

स्टार्कचं टी 20 करियर - 

मिचेल स्टार्कने 58 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये 73 विकेट घेतल्या आहेत. 20 धावा देऊन चार विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. 

IPL 2024 auction players list most expensive and chiepest : आयपीएलमध्ये कोण महाग, कोण स्वस्त? 

खेळाडू किंमत संघ
पॅट कमिन्स (Pat Cummins)   20.50 कोटी सनरायजर्स हैदराबाद (SRH)
हर्षल पटेल (Harshal Patel) 11.75 कोटी  पंजाब किंग्ज
गेराल्ड कोएत्जी (Gerald Coetzee ) 5 कोटी मुंबई इंडियन्स
अजमतुल्लाह ओमरजई 50 लाख गुजरात टायटन्स 
शार्दूल ठाकूर (Shardul Thakur)  4 कोटी  चेन्नई सुपर किंग्ज 
डॅरी मिचेल (Daryl Mitchell)  14 कोटी चेन्नई सुपर किंग्ज 
ख्रिस वोक्स  (Chris Woakes) 4.2 कोटी  पंजाब किंग्ज
रचिन रवींद्र (Rachin Ravindra) 1.80 कोटी चेन्नई सुपर किंग्ज 
 हसरंगा ( Wanindu Hasaranga)  1.5 कोटी  सनरायजर्स हैदराबाद
ट्रॅविस हेड (Travis Head) 6.8 कोटी सनरायजर्स हैदराबाद
हॅरी ब्रूक (Harry Brook)  4 कोटी दिल्ली कॅपिटल
रोवमॅन पॉवेल (Rovman Powell) 7.4 कोटी राजस्थान रॉयल्स
मिचेल स्टार्क (Mitchell Starc)  24.75 कोटी कोलकाता नाईट रायडर्स
 उमेश यादव (Umesh Yadav) 5.8 crore गुजरात टायटन्स
     
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Allu Arjun Hyderabad voting : चौथ्या टप्प्यातील मतदान, अल्लू अर्जूनने बजावला मतदानाचा हक्कShirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवादRavindra Dhangekar Family : आज मतदान, काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांची घरी देवपूजाChhatrapati Sambhajinagar Racket : 19 वर्षाच्या विद्यार्थीनीकडून गर्भनिदान रॅकेट, इंजिनिअरच्या तरुणीचा कारनामा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget