IPL Auction 2024 : कधीकाळी 75 लाख किंमत आणि आता मिळाले थेट 14 कोटी; लेकीच्या वाढदिवसाची तयारी करताना आयपीएल लाॅटरी!
IPL Auction 2024 : डॅरिल मिशेलला (Daryl Mitchell) महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने 14 कोटी रुपयांना विकत घेतले. मिशेलला यापूर्वी आयपीएल 2022 च्या लिलावात 75 लाख रुपयांना विकत घेतले होते.
IPL Auction 2024 : IPL 2024 च्या मिनी लिलावात अनेक खेळाडूंचे नशीब पालटले. अनेक खेळाडूंना मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले. काही खेळाडूंसोबत असे घडलं की, त्यांना आयपीएल लिलावात मिळालेल्या रकमेवर विश्वास बसलेला नाही. इंडियन प्रीमियर लीग लिलाव (IPL Auction 2024) दरम्यान न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला (Daryl Mitchell) महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने 14 कोटी रुपयांना विकत घेतले. मिशेलला यापूर्वी आयपीएल 2022 च्या लिलावात 75 लाख रुपयांना विकत घेतले होते.
DM your yellove for Daryl Mitchell 🤩🦁🥳 pic.twitter.com/HUUqJ9dhBn
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 19, 2023
मिशेलने सांगितले की तो आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे गिफ्ट त्याच्या घरी पॅक करत होता आणि लिलावात त्याचे नाव येताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. मिशेलच्या म्हणण्यानुसार, त्याचे कुटुंब टीव्हीवर मंगळवारी दुबईतील लिलाव LIVE पाहत होते. लिलावानंतर काही वेळातच 32 वर्षीय खेळाडूला आयुष्य बदलणारी रक्कम मिळाली होती.
"Santner was the first to message me as he welcomed me into the club, He is a CSK stalwart... Along with that Also Tommy Simsek messaged me"💫🦁💛#DarylMitchellpic.twitter.com/iAKB0DKlGY
— Hustler (@HustlerCSK) December 20, 2023
स्थानिक मीडियाशी बोलताना मिशेल म्हणाला, 'माझ्या कुटुंबासाठी ही खूप खास रात्र होती, मी माझ्या पत्नीसोबत लिलाव पाहत होतो. माझे नाव समोर येताना पाहून आणि नंतर लिलावाचा संपूर्ण अनुभव पाहता हा क्षण नक्कीच आयुष्यभर आपल्यासोबत राहील. मिशेल हा आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात न्यूझीलंडचा दुसरा सर्वात महागडा विकला जाणारा खेळाडू आहे, जो केन विल्यम्सच्या बरोबरीचा आणि फक्त काईल जेमिसनच्या मागे आहे. जेमिसनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2021 मध्ये 15 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
I've watched this about 14 times now. Daryl Mitchell's flow of the bat is just dead drop gorgeous. pic.twitter.com/BMTKLGzFOj
— romannnn (@rentboiy) December 21, 2023
डॅरिल मिशेलची आकडेवारी...
आयपीएल 2022 मध्ये डॅरिल मिशेलला 75 लाख रुपयांना विकले गेले होते, त्या हंगामात त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले होते. आयपीएल 2022 मध्ये मिचेलने राजस्थानसाठी फक्त 2 सामने खेळले आणि त्याने 16.50 च्या सरासरीने केवळ 33 धावा केल्या. मिशेल हा सर्व फॉरमॅटमधील किवी फलंदाज आहे. त्याने 20 कसोटी, 39 एकदिवसीय आणि 56 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने 53.77 च्या सरासरीने 1452 धावा केल्या आहेत, एकदिवसीय सामन्यात 52.56 च्या सरासरीने 1577 धावा केल्या आहेत, T20 आंतरराष्ट्रीय मध्ये त्याने 24.86 च्या सरासरीने आणि 137.22 च्या स्ट्राईक रेटने 1069 धावा केल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या