IPL Auction 2023 : शिवम मावी ते मुकेश कुमार, या अनकॅप्ड खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस
IPL 2023 Mini Auction: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी अर्थात IPL 2023 साठी मिनी ऑक्शन पार पडला असून काही खेळाडूंना चांगलीच रक्कम मिळाली आहे.
IPL 2023 Auction : आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसाठी सुरु लिलाव प्रक्रियेत भारताचा युवा गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi) सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. एकीकडे इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडत असताना काही भारतीय अनकॅप्ड खेळाडूंनीही चांगली कमाई केली आहे. यामध्ये शिवमसह मुकेश कुमार, विव्रांत शर्मा अशी नावं आहेत.
या लिलावात इंग्लंडचा सॅम करन (sam curran) 18.50 कोटी रुपयांना पंजाबने विकत घेतला असता तो आयपीएल इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर बेन स्टोक्सला 16.25 ला चेन्नईने आणि कॅमेरॉन ग्रीनला 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने विकत घेतलं. सर्वाधिक रक्कम मिळालेले हे आंतरराष्ट्रीय खेळाडू असून काही भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवरही पैशांचा पाऊस पडला. भारतीय अनकॅप्ड खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर शिवम मावी सर्वात महाग विकला गेला. शिवम मावीला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 6 कोटी रुपयांना विकत घेतले. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. शिवम मावीनंतर मुकेश कुमार हा दुसरा सर्वात महागडा अनकॅप्ड भारतीय खेळाडू होता. दिल्ली कॅपिटल्सने मुकेश कुमारला 5.50 कोटी रुपयांना खरेदी केले. या यादीत विव्रांत शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जम्मूच्या या युवा खेळाडूला गुजरात टायटन्सने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले. तर गुजरात टायटन्सने केएस भरतला 1.20 कोटींमध्ये विकत घेतले. तसंच विजय हजारे करंडक स्पर्धेत कमाल कामगिरी करणाऱ्या एन. जगदीशनला हवी तशी किंमत मिळाली नाही. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 90 लाख रुपयांना विकत घेतले.
सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू
शिवम मावी - 6 कोटी रुपये (गुजरात टायटन्स)
मुकेश कुमार - 5.50 कोटी रुपये (दिल्ली कॅपिटल्स)
विव्रांत शर्मा - 2.60 कोटी रुपये (सनरयझर्स हैदराबाद)
केएस भारत - 1.20 कोटी रुपये (गुजरात टायटन्स)
एन जगदीशन - 90 लाख रुपये (कोलकाता नाईट रायडर्स)
इंग्लंड खेळाडूंवर पैशांचा पाऊस
यंदाचा टी विश्वचषक 2022 इंग्लंडनं जिंकला, त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना चांगली बोली लागणार हे निश्चित होते. त्यामुळे आयपीएल इतिहासात सर्वात महागडा खेळाडू सॅम करन 18.50 कोटी रुपयांना पंजाब संघाला विकला गेला. तर बेन स्टोक्सलाही 16.25 कोटींना चेन्नई सुपरकिंग्सने विकत घेतलं. दरम्यान सॅम करन, बेन स्टोक्स यांना मिळालेल्या रेकॉर्डब्रेक किंमतीसह युवा खेळाडू हॅरी ब्रुकलाही तब्बल 13.25 कोटींना सनरायझर्स हैदराबाद संघाने विकत घेतलंं. तर आदिल रशीदला देखील हैदराबादने 2 कोटींना विकत घेतलं आहे.
हे देखील वाचा-