IPL 2025 Players Retention Live : विराट कोहलीला 21 कोटी तर ऋषभ पंतचे नाव गायब! रिटेन्शन लिस्ट पाहून सर्वांनाच बसणार धक्का
IPL 2025 Players Retention Announcement Live : 31 ऑक्टोबर हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक संस्मरणीय दिवस असणार आहे.
LIVE
Background
IPL 2025 Players Retention Live Update : 31 ऑक्टोबर हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक संस्मरणीय दिवस असणार आहे. लवकरच सर्व फ्रँचायझी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरुवारपर्यंत कायम ठेवण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे रिटेंशनशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी अपडेट फक्त एका क्लिकवर....
ऋषभ पंतचे नाव गायब! दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडूंना ठेवले कायम
दिल्ली कॅपिटल्स संघाने चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत ऋषभ पंतचे नाव नाही. त्याने कायम ठेवलेल्या चार खेळाडूंमध्ये अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांनी अक्षर पटेलला 16.5 कोटी, कुलदीप यादवला 13.25 कोटी, ट्रिस्टन स्टब्सला 10 कोटी आणि अभिषेक पोरेलला 4 कोटींमध्ये कायम ठेवले आहे.
विराट कोहलीला 21 कोटी! RCBने केवळ तीन खेळाडूंना ठेवले कायम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 साठी केवळ तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये विराट कोहली, यश दयाल आणि रजत पाटीदार यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनी विराट कोहलीला 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
IPL 2025 Players Retention Live : सीएसकेने 'या' 5 खेळाडूंना ठेवले कायम
चेन्नई सुपर किंग्ज संघाने महेंद्रसिंग धोनी, गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे आणि मथिशा पाथिराना यांना आयपीएल 2025 साठी कायम ठेवले आहे. धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
IPL 2025 Players Retention Live : रिटेन खेळाडूंची किमान किंमत
- पहिल्या खेळाडूची निवड - 18 कोटी
- दुसऱ्या खेळाडूची - 18 कोटी
- तिसऱ्या खेळाडूची निवड - 11 कोटी
- चौथ्या खेळाडूची निवड - 18 कोटी
- पाचव्या खेळाडूची निवड - 14 कोटी
- अनकॅप खेळाडू - 4 कोटी
पाच खेळाडूंना कायम ठेवल्यास एकूण - 75 कोटी
IPL 2025 Players Retention Live : कोलकाता रसेलला सोडणार?
कोलकाता फ्रँचायझी आंद्रे रसेलला सोडू शकते. रसेल अनेक वर्षांपासून केकेआरसोबत आहे.
KKR IS ALL SET TO RETAIN ANDRE RUSSELL...!!!! [Cricbuzz] pic.twitter.com/YQFqyqFJ9x
— Johns. (@CricCrazyJohns) October 31, 2024