Virat Kohli : विराट कोहलीच्या नावावर चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये तीन विक्रम, सहा धावा करताच...
Virat Kohli Record:चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीनं सहा धावा करताच टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
चेन्नई : टीम इंडियाचा आणि आरसीबीचा (RCB) आक्रमक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर मैदानावर परतला आहे. विराट कोहलीनं आतापर्यंत 376 टी-20 मॅच खेळल्या आहेत. आजच्या चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये विराटनं तीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहलीच्या टी-20 क्रिकेटची आजची 377 वी टी-20 मॅच आहे.
विराट कोहलीनं यापूर्वी 376 टी-20 मध्ये 11994 धावा केल्या होत्या. विराटची टी-20 मधील सर्वाधिक धावसंख्या 122 आहे. विराटनं 133.42 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर 8 शतकं असून त्यानं 91 अर्धशतकं लगावली आहेत. विराटनं 117 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचेस खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 138.16 च्या स्ट्राइक रेटनं 4037 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका शतकाची नोंद असून त्यानं 37 अर्धशतकं केली आहेत.
आयपीएलमध्ये विराट कोहलीनं 237 मॅचेस खेळल्या आहेत. विराटच्या नावावर आयपीएलमध्ये 7263 धावा आहेत. विराटची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 113 इतकी आहे. विराटच्या नावावर आयपीएलमध्ये 7 शतकांची नोंद असून 50 अर्धशतकं त्यानं लगावली आहेत. विराट कोहलीं 130.2 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या आहेत.
विराट कोहलीनं आज चेन्नईविरुद्ध 15 धावा केल्यानंतर त्याच्या सीएसकेविरुद्ध 1 हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. एखाद्या संघाविरुद्ध 1 हजार धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
चेन्नईचा पलटवार
टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणाऱ्या आरसीबीनं आक्रमक सुरुवात केली होती.आरसीबीचा कॅप्टन फाफ डुप्लेसिसनं आक्रमक बॅटिंग केली होती. त्यानं ८ चौकार मारत 35 धावा केल्या होत्या. चेन्नईचा मुस्तफिजूर रहमाननं त्याला बाद केल्यानंतर आरसीबी बॅकफूटवर गेली. यानंतर रहमाननं आरसीबीच्या चार विकेट घेतल्या आहेत. रजत पाटीदार, विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीनला बाद करत रहमाननं आरसीबीचं कंबरडं मोडलं. दीपक चहरनं ग्लेन मॅक्सवेलला शुन्यावर बाद केलं.
विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीन डाव सावरणार असं वाटत असतानाच रहमाननं दोघांनाही बाद केलं. विराट कोहीलनं 21 धावा केल्या. यामध्ये त्यानं एक षटकार मारला. दुसरीकडे कॅमरुन ग्रीनं देखील 18 धावा करुन बाद झाला.
विराट कोहलीला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश
विराट कोहली आज फाफ डु प्लेसिससोबत सलामीला उतरला. फाफ डु प्लेसिसनं आक्रमक बॅटिंग सुरु केली होती. दुसरीकडे विराध सावधपणे बॅटिंग करत होता. फाफ डु प्लेसिस बाद झाल्यानंतर विराट कोहली कॅमरुन ग्रीनच्या साथीनं मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असतानाच तो बाद झाला. मुस्तफिजूर रहमाननं बंगळुरुला चार धक्के देत अडचणीत आणलं.
संबंधित बातम्या :
CSK vs RCB : पहिल्या मॅचपूर्वी ऋतुराज गायकवाडचं टेन्शन मिटलं, हुकमी एक्का फिट