(Source: ECI/ABP News/ABP Majha)
4, 6, 6, 6, 4 अभिषेक शर्माच्या स्फोटक बॅटिंगनं पाया रचला, हैदराबादकडे मॅच कधी फिरली? जाणून घ्या टर्निंग पॉइंट
CSk vs SRH : चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत सनरायजर्स हैदराबादनं गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. सनरायजर्स हैदराबाद चेन्नईवर 6 विकेटनं विजय मिळवला.
हैदराबाद : सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) आज झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ला 6 विकेटनं पराभूत केलं आहे. चेन्नई सुपर किंग्जला हैदराबादच्या बॉलर्सनी 20 ओव्हर्समध्ये 5 विकेटवर 165 धावांवर रोखलं. बॉलर्सनी कामगिरी फत्ते केल्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला कमबॅक करुन दिलं नाही. ट्रेविस हेडनं 31 आणि अभिषेक शर्मानं 37 धावांच्या जोरावर हैदराबादला आक्रमक सुरुवात करुन दिली.
मोईन अलीनं कॅच सोडला
हैदराबादच्या डावाच्या पहिल्या ओव्हरमध्ये ट्रेविस हेडचा कॅच यंदाच्या आयपीएलमध्ये पहिली मॅच खेळणाऱ्या मोईन अलीनं सोडला. यानंतर ट्रेविस हेडनं 31 धावा केल्या.
इम्पॅक्ट प्लेअरचा हैदराबादला फायदा, चेन्नईला तोटा झाल्याचं पाहायला मिळालं. सनरायजर्स हैदराबादनं इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ट्रेविस हेडला संघात घेतलं होतं त्यानं 31 धावा केल्या. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जनं इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मुकेश चौधरीला संघात घेतलं होतं. मुकेश चौधरीनं एका ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या.
अभिषेक शर्माची दमादर फलंदाजी
पहिल्या ओव्हरमध्ये ट्रेविस हेडच्या कॅच सुटल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं इम्पॅक्ट प्लेअर असलेल्या मुकेश चौधरीला ओव्हर दिली. या मॅचमध्ये अभिषेक शर्मानं स्फोटक फलंदाजी केली. अभिषेक शर्मानं मुकेश चौधरीच्या बॉलिंगवर तीन षटकार आणि दोन चौकार मारत एकूण 27 धावा वसूल केल्या. अभिषेक शर्मानं चेन्नई विरोधात 37 धावांची खेळी करुन हैदराबादच्य विजयाचा पाया रचला.
ट्रेविस हेड आणि एडन मार्क्रमनं देखील हैदराबादच्या विजयामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. ट्रेविस हेडनं 31 धावा केल्या तर मार्क्रमनं 51 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादनं 6 विकेटनं चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं. हैदराबादनं 19 व्या ओव्हरमध्येच 1 पहिल्या बॉलवर विजयावर नाव कोरलं.
सीएसकेकडून हैदराबादकडे मॅच कधी गेली?
हैदराबादनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हैदराबादच्या बॉलर्सनी चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके मारु दिले नाहीत. चेन्नईचे सलामीवीर लवकर बाद झाले. रचिन रवींद्रनं 12 धावा केल्या. तर, ऋतुराज गायकवाडनं 26 धावा केल्या. यानंतर शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे यांनी चेन्नईचा डाव सावरला. मात्र,शिवम दुबेनं 45 धावा केल्या असताना डावाच्या 14 व्या ओव्हरमध्ये कॅप्टन पॅट कमिन्सननं शिवब दुबेला बाद केलं. यानंतर चेन्नईला पुढील सहा ओव्हरमध्ये म्हणाव्या तशा धावा काढता आल्या नाहीत.
संबंधित बातम्या :
Video: मुंबईचे सलग तीन पराभव, हार्दिक पांड्या महादेवाच्या चरणी, सोमनाथ मंदिरात पूजा