IPL 2024: रोहित-कोहली अन् धोनीला आयपीएलमध्ये किती पगार मिळतो?
IPL 2024 Salary : आयपीएल 2024 साठी नुकताच दुबईमध्ये लिलाव पार पडला. या लिलावात मिचेल स्टार्क याला रेकॉर्डतोड बोली लागली.
IPL 2024 Salary : आयपीएल 2024 साठी नुकताच दुबईमध्ये लिलाव पार पडला. या लिलावात मिचेल स्टार्क याला रेकॉर्डतोड बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्सने स्टार्कल 24.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. त्याशिवाय पॅट कमिन्स याला 20 कोटींपेक्षा जास्त रक्कम देऊन हैदराबादने घेतलेय. पण विराट कोहली, एमएस धोनी अन् रोहित शर्माला आयपीएलमध्ये किती पगार मिळतो, हे तुम्हाला माहिती आहे का? विराट कोहली आरसीबीच्या ताफ्यात आहे. तर धोनी चेन्नईचा बॉस आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची जान आहे. या तिन्ही खेळाडूंच्या पगाराविषयी नक्कीच मनात कुतहूल असेल. पाहूयात... त्यांना किती रक्कम मिळते...
1- महेंद्र सिंह धोनी
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली. धोनीमुळेच चेन्नई आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरलाय. गतवर्षी धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने चषकावर नाव कोरलं. आयपीएल 2024 साठी चेन्नईचा संघ धोनीला 12 कोटी रुपयांचा पगार देतेय. आयपीएल 2022 च्य लिलावाआधी धोनीला चेन्नईने 12 कोटी रुपयांत खरेदी केले होते.
2- विराट कोहली
आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाज विराट कोहली, मागील 16 हंगामापासून आरसीबीच्या ताफ्यात आहे. विराट कोहलीला आरसीबीने आयपीएलच्या पहिल्या हंगामात खरेदी केले होते. तेव्हापासून तो आरसीबीचा सदस्य आहे. एकाच संघाकडून 16 हंगाम खेळणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. आयपीएल 2024 साठी आरसीबी विराट कोहलीला 15 कोटी रुपये देत आहे. 2022 आयपीएल लिलावाआधी आरसीबीने विराट कोहलीला 15 कोटी रुपयांत रिटेन केले होते.
3- रोहित शर्मा
रोहित शर्माने मुंबईला पाच आयपीएल चषक जिंकून दिले. तो मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आयपीएल 2024 साठी मुंबई रोहित शर्माला 16 कोटी रुपये पगार देत आहे. 2022 च्या लिलावाच्या आधी मुंबईने रोहित शर्माला 16 कोटी रुपयात रिटेन केले होते. यंदा रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार नसेल, मुंबईने हार्दिक पांड्याच्या खांद्यावर धुरा दिली आहे.
4- मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सात वर्षानंतर आयपीएलमध्ये कमबॅक केलेय. त्याचे कमबॅक शानदार झालेय. स्टार्कला कोलकात्याने 24.75 कोटी रुपयांत खरेदी केलेय. स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.
5- पॅट कमिन्स
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यावर लिलावात पैशांचा पाऊस पडलाय. सनरायजर्स हैदराबाद संघाने पॅट कमिन्स याला 20.50 कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले. कमिन्स आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.