एक्स्प्लोर

IPL 2024, GT vs RR : राजस्थानचा विजयरथ रोखला, राशिद खान ठरला जाएंट किलर, गुजरातचा अशक्यप्राय विजय

GT vs RR : आयपीएलच्या 17 व्या पर्वात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने आले होते. राजस्थाननं 20 ओव्हर्समध्ये 3 बाद 196 धावा केल्या होत्या.

जयपूर :  राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि  गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात 24 वी मॅच पार पडली आहे.  गुजरात टायटन्सनं  टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेत राजस्थानला फलंदाजीला आमंत्रित केलं होतं. राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन आणि रियान परागनं डाव सावरला. रियान परागनं 76 धावा केल्या तर संजू सॅमसननं नाबाद 68 धावा केल्या. या धावांच्या जोरावर राजस्थाननं गुजरातसमोर 3 बाद 196 धावांचा डोंगर उभारला. राशिद खान वगळता गुजरातचे इतर बॉलर्स चांगली कामगिरी करु शकले नाहीत. त्यामुळं राजस्थानला धावांचा डोंगर उभा करता आला. 196 धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातनं सावध आणि आक्रमक सुरुवात केली होती.  मात्र, कुलदीप सेननं बॉलिंगद्वारे राजस्थनला बॅक फूटवर ढकललं. शुभमन गिलला 72 धावांवर असताना युजवेंद्र चहलनं बाद केलं.  यानंतर राहुल तेवातिया आणि राशिद खाननं राजस्थानच्या हातून विजय खेचून आणला. 

कुलदीप सेननं गुजरातचं कंबरडं मोडलं  

गुजरातच्या संघानं डावाची सुरुवात आक्रमकपणे केली होती. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन यानं कुलदीप सेनला संधी दिली होती. कुलदीप सेननं संजू सॅमसनचा विश्वास सार्थ ठरवत  राजस्थानला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं साई सुदर्शनला 35 धावांवर बाद केलं. यावेळी संजू सॅमसनचा डीआरएसचा निर्णय यशस्वी ठरला. त्याच कुलदीप सेननं पुढील ओव्हरमध्ये गुजरातला आणखी दोन धक्के दिले. मॅथ्यू वेडला आणि अभिनव मनोहरला कुलदीप सेननं बाद केलं यामुळं राजस्थाननं मॅचमध्ये कमबॅक केलं होतं. मात्र, कुलदीप सेननं 19 व्या ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या आणि मॅच राजस्थानच्या हातातून निसटली.

युजवेंद्र चहलचे  गुजरातला दोन धक्के

युजवेंद्र चहलनं विजय शंकर याला 16 धावांवर बाद केलं. त्यानंतर युजवेंद्र चहलनं गुजरातचा कॅप्टन शुभमन गिलला 72 धावांवर बाद केलं. शुभमन गिलच्या रुपानं गुजरातला मोठा धक्का बसला. शाहरुख खाननं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र आवेश खाननं त्याला बाद केलं. 

संजू सॅमसन आणि रियान परागनं राजस्थानचा डाव सावरला

राजस्थाननं पहिल्यांदा बॅटिंग केली तेव्हा त्यांचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल 24 धावा करुन बाद झाला. तर, गेल्या मॅचमध्ये आरसीबी विरुद्ध शतक झळकवणारा जोस बटलर मोठी धावसंख्या उभारु शकला नाही त्यानं 8 धावा केल्या.  रियान परागनं आणि संजू सॅमसननं केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थाननं 20 ओव्हरमध्ये 3 बाद 196 धावा केल्या होत्या.  

संबंधित बातम्या :

IPL 2024, RR vs GT : राजस्थानचा पलटवार, सॅमसन अन् परागनं शुभमनचा खेळ बिघडवला, गुजरातसमोर किती धावांचं आव्हान?

 IPL 2024, RR vs GT : आरसीबीविरुद्ध शतक, शुभमन गिलचा बटलरसाठी विशेष प्लॅन, राशिदच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गेम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षणVinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटलेVinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget