Rinku Singh : रिंकू सिंगचे कोचसह 'ओले ओले' गाण्यावर ठुमके, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Rinku Singh: कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार खेळाडू रिंकू सिंगनं कोच चंद्रकांत पंडित यांच्यासह केलेल्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केकेआरनं शेअर केला आहे.
Rinku Singh Viral Dance Video कोलकाता:आयपीलच्या (IPL 2024) 17 व्या पर्वाचा महासंग्राम उद्यापासून सुरु होणार आहे.चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यातील सामन्यानं आयपीएल सुरु होणार आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पहिला सामना 23 मार्चला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. केकेआरची टीम यंदाच्या आयपीएलमध्ये स्पर्धेतील तिसरं विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल. या टीमचं नेतृत्त्व सध्या श्रेयस अय्यर यांच्याकडे आहे. केकेआरचा स्टार खेळाडू रिंकू सिंग (Rinku Singh) सोशल मीडियावर चर्चेत आहे. रिंकू सिंगनं सराव सामन्यात मिशेल स्टार्कला मारलेल्या सिक्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता रिंकू सिंगचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो कोच चंद्रकांत पंडित यांच्यासह डान्स करताना दिसत आहे. रिंकू सिंगचा प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासह ओले ओले गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
रिंकू सिंगच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये प्रशिक्षक चंद्रकांत पंडित देखील आहेत. कोलकाता नाइट रायडर्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. रिंकूच्या व्हिडिओवर सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांकडून चांगल्या कमेंट केल्या जात आहेत.
रिंकू सिंगचं क्रिकेट करिअर
रिंकू सिंगनं टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये केकेआरचं प्रतिनिधीत्व केलं आहे. टीम इंडियाकडून त्यानं 2 वनडे मॅच आणि 15 टी-20 मॅचमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतासाठी त्यानं टी-20 मध्ये 176.24 च्या स्ट्राइक रेटनं 89 च्या सरासरीनं 365 धावा केल्या आहेत. रिंकूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 69 इतकी आहे. रिंकूनं दोन अर्धशतकं देखील केली आहेत. रिंकूच्या आयपीएल करिअरवर लक्ष दिलं असता त्यानं आयपीएलमध्ये 31 मॅचेस खेळल्या आहेत. या मॅचमध्ये त्यानं 725 धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. रिंकूचा आयपीएलमधील बेस्ट स्कोअर 67 धावा असा आहे. रिंकूचं आयपीएलमधील स्ट्राइक रेट 142.16 इतकं असून सरासरी 36.25 इतकी आहे.
Dancing with the stars! 😂🫶 pic.twitter.com/RhohD3iGCA
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 20, 2024
आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाची दारं उघडली
रिंकू सिंगनं 2022 आणि 2023 च्या आयपीएलमध्ये केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. रिंकूनं 2022 च्या आयपीएलमध्ये 7 मॅचमध्ये 174 धावा केल्या होत्या. तर, 2023 च्या आयपीएलमध्ये त्यानं 14 मॅचमध्ये 474 धावा केल्या होत्या. रिंकू सिंगला आयपीएलमधील या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाची दार उघडली. नुकत्याच पार पडलेल्या टीम इंडियाच्या टी-20 मालिकेत रिंकू सिंगला संधी मिळाली होती. रिंकू टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडमधील महत्त्वाचा क्रिकेटपटू मानला जातो.
संबंधित बातम्या :
उद्यापासून रंगणार आयपीएलचा महासंग्राम; चेपॉक सज्ज, ए.आर. रहमानसह कोण परफॉर्मन्स करणार?, जाणून घ्या