उद्यापासून रंगणार आयपीएलचा महासंग्राम; चेपॉक सज्ज, ए.आर. रहमानसह कोण परफॉर्मन्स करणार?, जाणून घ्या
IPL 2024: चेपॉक स्टेडियमवरील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IPL 2024: चेन्नईतील ऐतिहासिक एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2024 च्या हंगामातील पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (Royal Challegers Bangaluru) यांच्यात रंगणार आहे. यावेळी दोनही संघ सज्ज असताना चेपॉक देखील सज्ज झालं आहे. चेपॉक स्टेडियमवरील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध गायक ए. आर. रहमान आणि सोनू निगम आयपीएल 2024 च्या उद्घाटन समारंभात परफॉर्मन्स करणार आहे. 22 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ देखील परफॉर्म करणार आहेत. उद्घाटन सोहळा सांयकाळी 6.30 वाजता सुरू होईल आणि सामना 7.30 वाजता सुरू होईल.
The stage is set, the lights are bright, and the stars are ready to shine at the #TATAIPL 2024 Opening Ceremony! 🎉🥳
— IndianPremierLeague (@IPL) March 20, 2024
Get ready for an unforgettable fusion of cricket and entertainment ft. a stellar lineup! ✨
🗓22nd March
⏰6:30 PM onwards pic.twitter.com/7POPthFITx
पहिला सामना ब्लॉक ब्लास्टर-
आयपीएल 2024 ची सुरुवात ब्लॉक ब्लास्टर सामन्याने होणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला घरच्या मैदानावर आव्हान देताना दिसणार आहे. दोन्ही संघांबद्दल बोलायचे झाले तर आरसीबी प्रत्येक विभागात संतुलित दिसत आहे. त्याचवेळी सीएसकेचे गोलंदाजी आक्रमण थोडे कमजोर दिसत आहे. यासोबतच डेव्हॉन कॉनवे आणि पाथीरानाला झालेल्या दुखापतींमुळेही सीएसकेच्या ताफ्यात टेंन्शन वाढले आहे.
24 मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स
सध्या 7 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर झाले असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर न झाल्याने उर्वरित वेळापत्रक जाहीर केले जाईल. 24 मार्चला आयपीएल 2022चे विजेते आणि गेल्या वर्षीचे उपविजेते गुजरात टायटन्स (GT) आणि पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) रविवारी अहमदाबादमध्ये आमनेसामने येणार आहेत.
पाहा IPL 2024 वेळापत्रक-
22 मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
23 मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
23 मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
24 मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
24 मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
25 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
26 मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
27 मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
28 मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
29 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
30 मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
31 मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
31 मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
1 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
2 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
3 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
4 एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
5 एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
6 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
7 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ