IPL 2024 RCB vs CSK: बंगळुरुविरुद्ध चेन्नई प्रथम गोलंदाजी करणार; प्ले ऑफचं तिकिट कोण पटकावणार?, पाहा Playing XI
IPL 2024 RCB vs CSK: आरसीबी आणि चेन्नई प्लेऑफच्या (Playoffs) उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
IPL 2024 RCB vs CSK: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2024 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. आरसीबी आणि चेन्नई प्लेऑफच्या (Playoffs) उंबरठ्यावर आहेत.
चेन्नईकडे 13 मॅचमध्ये 14 गुण आहेत. तर आरसीबीकडे 12 गुण आहेत. चेन्नईनं विजय मिळवल्यास ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. तर, दुसरीकडे आरसीबीला मोठ्या फरकानं चेन्नईवर विजय मिळवत चांगल्या नेट रनरेटच्या आधारे प्रवेश मिळू शकतो. आरसीबीला चेन्नईवर 18 पेक्षा अधिक धावांनी किंवा 18.1 एक ओव्हरपूर्वी जी धावसंख्या असेल ती पूर्ण करावी लागेल.
🚨 Toss Update 🚨
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
Chennai Super Kings elect to bowl against Royal Challengers Bengaluru.
Follow the Match ▶️ https://t.co/7RQR7B2jpC#TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/CMJy3elx12
चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन-
रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश तिक्षणा
Chennai Super Kings (Playing XI): Rachin Ravindra, Ruturaj Gaikwad(c), Daryl Mitchell, Ajinkya Rahane, Ravindra Jadeja, MS Dhoni(w), Mitchell Santner, Shardul Thakur, Tushar Deshpande, Simarjeet Singh, Maheesh Theekshana
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्लेइंग इलेव्हन-
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन
Royal Challengers Bengaluru (Playing XI): Faf du Plessis(c), Virat Kohli, Glenn Maxwell, Rajat Patidar, Cameron Green, Mahipal Lomror, Dinesh Karthik(w), Karn Sharma, Yash Dayal, Lockie Ferguson, Mohammed Siraj
खेळपट्टी कशी असेल?
एम चिन्नास्वामी स्टेडियमध्ये पिच बॅटिंगसाठी फायदेशीर ठरते. हैदराबादनं या मैदानावर 287 धावांची खेळी केली होती. आरसीबीनं त्याचा पाठलाग करताना 262 धावा केल्या होत्या. ड्यूच्या कारणामुळं टॉस जिंकणारा कॅप्टन पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेऊ शकतो.
चिन्नास्वामीवरील रेकॉर्ड
यंदाच्या आयपीएलमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत 6 मॅच झाल्या आहेत. यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघानं 3 वेळा तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी 3 वेळा मॅच जिंकल्या आहेत. आरसीबीला होम ग्राऊंडवर विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. चेन्नईनं या मैदानावर 11 मॅच खेळल्या असून त्यांनी 6 वेळा विजय मिळवला आहे.