एक्स्प्लोर

MI vs SRH: मुंबई अन् हैदराबाद पहिल्या विजयासाठी भिडणार, अशी असू शकते हार्दिक आणि पॅट कमिन्सची ड्रीम टीम 

IPL 2024:कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादला पराभव स्वीकारावा लागला होता. तर मुंबईला गुजरातनं पराभूत केलं होतं. दोन्ही संघ पहिला विजय मिळवण्याच्या इराद्यानं खेळतील.

MI vs SRH Playing XI हैदराबाद : हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्त्वातील सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यात आज लढत होत आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सला पहिल्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. हार्दिक पांड्यानं मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व स्वीकारल्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आज आयपीएलमध्ये (IPL 2024) भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता राजीव गांधी इंटरनॅशन स्टेडियम हैदराबादमध्ये ही मॅच होईल. दोन्ही संघ आज यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवण्यासाठी आतूर असतील.  हार्दिक पांड्याला कालच एक धक्का बसला आहे, कारण मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला नॅशनल क्रिकेट अकादमीकडून फिट असल्याचं प्रमाणपत्र मिळालं नसल्यानं तो आणखी एका मॅचला मुकला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सात मॅचेसमध्ये होम ग्राऊंड असलेल्या टीमनं मॅच जिंकल्या आहेत. हा ट्रेंड ब्रेक करण्याची संधी मुंबई इंडियन्सकडे आहे.

मुंबई इंडियन्सची मदार फलंदाजांवर    

मुंबई इंडियन्सला पहिल्या मॅचमध्ये 6 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला होता. त्यामुळं हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. रोहित शर्मासह इशान किशनला चांगल्या धावा काढाव्या लागतील. याशिवाय तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या, टीम डेविड यांच्यावर फलंदाजांची जबाबदारी असेल.शम्स मुलानी, पियूष चावला, गेराल्ड कोएत्जी, जसप्रीत बमराह, ल्यूक वुड प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतील. 

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेविड, शम्स मुलानी, पीयूष चावला, गेराल्ड कोएत्जी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड

सनरायजर्सची भिस्त हेन्रिक क्लासेनवर

सनरायजर्स हैदराबादला कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पहिल्या लढतीत 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. कोलकातानं दिलेल्या 208 धावांचं आव्हान पार करताना हैदराबादनं 204 धावा केल्या होत्या. त्या मॅचमध्ये हेन्रिक क्लासेननं वादळी फलंदाजी केलीहोती.  हैदराबादकडून मयांग अग्रवाल, राहुल त्रिपाठी हे डावाची सुरुवात करु शकतात. एडेन मार्करम, हेन्रिक क्लासेन,अब्दुल समाद,शहाबाज अहमद हे हैदराबादच्या बॅटिंगची धुरा सांभाळतील. तर हैदराबादच्या बॉलिंगची धुरा मार्को जानसन, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन यांच्यावर असेल.  

सनराइजर्स हैदराबादची संभाव्य टीम 

मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम,हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, मार्को जानसन, पैट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी. नटराजन

संबंधित बातम्या : 

Sameer Rizvi : समीर रिझवीचे राशिद खानला खणखणीत सिक्सर, थेट आंद्रे रस्सेलच्या पंक्तीत एंट्री, चेन्नईचे पैसे वसूल

Ajinkya Rahane: अजिंक्यनं हनुमान उडी मारत घेतला अफलातून कॅच, गुजरातच्या डेव्हिड मिलरचा कार्यक्रम,पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jackie Shroff on Bhidu : परवानगीशिवाय 'भिडू' शब्द वापरण्यावर आक्षेप, जॅकी श्रॉफ कोर्टात ABP MajhaAaditya Thackeray on MNS : ...म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला का? काकांच्या कार्यकर्त्यांना थेट सवाल...Sharad Pawar Ghatkopar Hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी शरद पवार दाखल, अपघाताची घेतली माहितीGhatkopar Bhavesh Bhinde Absconded : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे फरार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Embed widget