एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPL 2024 : सूर्या आयपीएलमध्ये कधी खेळणार? मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं दिलं मोठं अपडेट 

Suryakumar Yadav, IPL 2024 : टी20 मधील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना खेळला नाही.

Suryakumar Yadav, IPL 2024 : टी20 मधील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना खेळला नाही. मुंबई इंडियन्सला (mumbai indians) सुरुवातीच्या सामन्यात सूर्यकुमार यादव याची कमी जाणवली. सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीमुळे पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबईचा दारुण पराभव झाला.  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सचा आज यंदाच्या हंगामातील तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरोधात (mi VS rr) घरच्या मैदानावर होणार आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून सूर्यकुमार यादव मुंबईच्या ताफ्यात कधी परतणार? याचीच चर्चा सुरु आहे. सूर्यकुमार यादव गेल्या काही दिवसांपासून एनसीएमध्ये फिटनेसवर काम करतोय. सूर्या मुंबईच्या ताफ्यात कधी दाखल होणार? याबाबतची माहिती स्टार फिरकी गोलंदाज पियूष चावला यानं दिली आहे.  

सूर्यकुमारच्या मैदानात कधी उतरणार ?

वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये लढत होणार आहे. आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळण्याची शक्यता नाही. सामन्याआधी पियूष चावलाने सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबाबत माहिती दिली. पियूष चावला म्हणाला की, "सूर्यकुमार यादव याच्या फिटनेसबाबत एनसीएमधून कोणताही माहित मिळालेली नाही. सूर्यकुमार यादव बंगळुरुमध्ये एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे. त्याच्याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. खेळाडूपेक्षा प्रशिक्षकाला याबाबत जास्त माहिती असेल. "

घरच्या मैदानावर मुंबईचा पहिलाच सामना - 

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळणार आहे. राजस्थान आणि मुंबई यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी होणार आहे. मुंबईला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे ते गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबई आज विजयाचं खाते उघडण्यासाठी मैदानात उतरले. आजच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यास टीका आणि अडचणीचा सामना करावा लागेल.  

डिसेंबर 2023 पासून सूर्या क्रिकेटपासून दूर - 

आयपीएल 2023 मध्ये सूर्यकुमार यादव यानं झंझावती फलंदाजी केली होती. सूर्यानं 16 व्या हंगामात 600 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला होता. विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यानंतर सूर्यकुमार यादव याला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूरच आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव आयपीएलचे सुरुवातीचे सामने मुकण्याची शक्यता आहे. एनसीएकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळता येणार आहे. आगामी विश्वचषक पाहता बीसीसीआय कोणताही धोका पत्करणार नाही. सूर्यकुमार यादवने मुंबईसाठी 85 सामन्यात 2641 धावा केल्या आहेत.  

विश्वचषकासाठी सूर्याची फिटनेस महत्वाची -

आयपीएल 2024 नंतर भारतीय संघ टी 20 विश्वचषकासाठी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये जाणार आहे. विश्वचषकामध्ये सूर्यकुमार यादवची उपस्थिती टीम इंडियासाठी महत्वाची आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव याच्याबाबत बीसीसीआय कोणताही धोका पत्कारणार नाही. 100 टक्के तंदुरुस्त झाल्यानंतर सूर्यकुमार यादव याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM TOP  630 AM 26 November 2024 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सSanjay Bhor on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या पठ्ठ्याने कारण सांगितलंRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्तीRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget