VIDEO : आयपीएलआधी मुंबई इंडियन्सचा ताफा अलिबागमध्ये, रिसॉर्टमध्ये करणार मौजमज्जा!
IPL 2024 Mumbai Indians Radisson Resort Alibaug : अलिबागमधील रेडीसन रिसॉर्टमध्ये मुंबईचा संघ विश्रांतीसाठी पोहचला आहे. आयपीएलआधी खेळाडूंना विश्रांती मिळावी, या हेतूने सर्वजण अलिबागला पोहचले आहेत.
Mumbai Indians at Radisson Resort Alibaug : मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2024 साठी (IPL 2024) सज्ज झाला आहे. यंदा मुंबईचा संघ (Mumbai Indians) रोहित शर्माच्या नेतृत्वाशिवाय मैदानात उतऱणार आहे. मागील तीन हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे यंदा हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. आयपीएल 2024 साठी (IPL 2024) मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) कंबर कसली आहे, कसून सरावाला सुरुवात केली. आयपीएलमध्ये मुंबईचा पहिला सामना गुजरात संघाविरोधात अहमदाबाद येथे होणार आहे. त्याआधी मुंबईचा संघ अलिबागमध्ये दाखल झालाय. अलिबागमधील रेडीसन रिसॉर्टमध्ये मुंबईचा संघ विश्रांतीसाठी पोहचला आहे. आयपीएलआधी खेळाडूंना विश्रांती मिळावी, या हेतूने सर्वजण अलिबागला पोहचले आहेत.
IPL 2024 Mumbai Indians : आयपीएलआधी आरामासाठी अलिबागला पोहचला मुंबईचा ताफा -
अलिबागमधील रेडीसन रिसॉर्टमध्ये मुंबई इंडियन्सचा ताफा मंगळवारी दाखल झाला. दोन दिवस अलिबागमध्ये संपूर्ण संघ विश्रांती घेणार आहे. रेडीसन रिसॉर्टमध्ये सुरक्षा तैणात करण्यात आली आहे. मंगळवारी गेटवे ऑफ इंडिया येथून 12 जणांचा ताफा मांडवा येथे बोटीने दाखल झाला होता. समुद्रामार्गे जाताना मुंबईच्या खेळाडूंनी मौजमजा केली. मांडवा येथून संपूर्ण संघ बसने गोंधळपाडा येथील रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल झाला. रेडीसन रिसॉर्टमध्ये मुंबईच्या संघाचे पारंपारिक पद्धतीने स्वगात करण्यात आले. आज रेडीसन रिसॉर्टमधून मुंबईचा ताफा झिराड येथील खासदी फार्महाऊसवर जाणार आहेत.
View this post on Instagram
IPL 2024 Mumbai Indians : 52 जणांचा ताफा रेडीसन रिसॉर्टमध्ये -
हार्दिक पांड्या, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड, ब्रेव्हिस, दिलशान मदुशंखा, गेराल्ड कोएत्झी, ईशान किशन, कुमार कार्तिकेय, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमरिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, सिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, ल्यूक वूड, विष्णू विनोद यांच्यासह कोच आणि सपोर्ट स्टाफ रेडिसन रिसॉर्टमध्ये मंगळवारी पोहचले. तेथे संपूर्ण संघाने आराम केला. विशेष म्हणजे, मुंबईच्या ताफ्यासोबत रोहित शर्मा दिसला नाही.
View this post on Instagram
चाहत्यांची गर्दी -
गेट वे ऑफ इंडिया आणि अलिबागमध्ये मुंबईच्या खेळाडूंसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांमध्ये झुंबड उडाली होती. रिसॉर्टमध्येही पर्यटकांनी खेळाडूंसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. पीयूष चावलासोबत बच्चेकंपनींनी फोटो काढले. लसिथ मलिंगा, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यासारख्या स्टाऱ खेळाडूंसोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांमध्ये झुंबड उडाली होती. चाहत्यांची गर्दी पाहून सुरक्षारक्षकांची मात्र फजिती उडाली.
IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचं सुरुवातीच्या सामन्याचं वेळापत्रक - (Mumbai Indians Time Table)
GT vs MI, गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
SRH vs MI, सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
MI vs RR, मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
MI vs DC, मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
Mumbai Indians (MI) Squad : मुंबई इंडियन्सचे शिलेदार कोण कोणते ?
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (कर्णधार), गेराल्ड कोएत्जी, नुवान तुषारा, दिलशान मधुशंका, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, नमन धीर, अंशुल कंबोज, शिवालीक शर्मा
Mumbai Indians Players: Akash Madhwal, Arjun Tendulkar, Dewald Brevis, Ishan Kishan, Jason Behrendorff, Jasprit Bumrah, Kumar Kartikeya Singh, N. Tilak Varma, Nehal Wadhera, Piyush Chawla, Rohit Sharma, Romario Shepherd (T), Shams Mulani, Surya Kumar Yadav, Tim David, Vishnu Vinod, Hardik Pandya (C), Gerald Coetzee, Nuwan Thushara, Dilshan Madushanka, Mohammad Nabi,Shreyas Gopal, Naman Dhir, Anshul Kamboj,Shivalik Sharma