MI vs PBKS : MI vs PBKS : धवन कमबॅक करणार का? मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण?
IPL 2024 MI vs PBKS : आयपीएलच्या मैदानात आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे.
IPL 2024 MI vs PBKS : आयपीएलच्या मैदानात आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. हा सामना मुल्लांपुरमधील महाराजा यादवेन्द्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहे. पंजाब आणि मुंबई संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी सरासरीच राहिली आहे. दोन्ही संघाचे आतापर्यंत सहा सहा सामने झालेत. दोन्ही संघाचे चार चार गुण आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. पंजाब किंग्स गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे, तर मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर विराजमान आहे. आजच्या सामन्यात धवन कमबॅक करण्याची शक्यता आहे. पंजाब आणि मुंबईची प्लेईंग 11 कशी असेल... पिच रिपोर्ट काय सांगतो.. याबाबत जाणून घेऊयात..
पिच रिपोर्ट
मुल्लांपुर येथील महाराजा यादवेन्द्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजी सोपी होते. कारण दव पडल्यामुळे गोलंदाजी करणं कठीण जातं. पंजाबने याच मैदानावर 175 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. या मैदानावर दुसऱ्या डावात फलंदाजी कऱणाऱ्या संघाला फायदा मिळतो.
हेड टू हेड
पंजाब आणि मुंबई या संघामध्ये आतापर्यंत आयपीएलचे 31 सामने झाले आहेत. मुंबई आणि पंजाब यांच्यातील लढत काटे की राहिली आहे. पंजाबनं 15 तर मुंबईने 16 सामन्यात विजय मिळवला आहे. आजचा सामनाही रोमांचक होण्याची शक्यता आहे.
पंजाब किंग्सची संभाव्य प्लेईंग 11
जॉनी बेयरस्टो, अथर्व टायडे/शिखर धवन, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंह, आशुतोष शर्मा, हरप्रीत बराड, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, कगिसो रबाडा.
इम्पॅक्ट प्लेयर- प्रभसिमरन सिंह/राहुल चाहर.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेविड, मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, गेराल्ड कोएत्ज़ी, जसप्रित बुमरा, आकाश मधवाल.
इम्पॅक्ट प्लेयर- सूर्यकुमार यादव.