IPL 2024 Latest Points Table: मुंबईचा पराभव करत चेन्नई तिसऱ्या स्थानी; इतर संघांची स्थिती काय?, पाहा Latest Points Table
चेन्नईने या हंगामात चौथ्या विजयाची नोंद केली. या विजयानंतर आयपीएल 2024च्या गुणतालिकेत बदल झाला आहे.
IPL 2024 Latest Points Table: चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएलच्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (MI) पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने 20 धावांनी विजय मिळवला. वेगवान गोलंदाज मथिशा पथिरानाने चेन्नईसाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. चेन्नईने या हंगामात चौथ्या विजयाची नोंद केली. या विजयानंतर आयपीएल 2024च्या गुणतालिकेत बदल झाला आहे.
मुंबईविरुद्धच्या विजयानंतर चेन्नई गुणतालिकेत 8 गुण आणि +0.726 च्या नेट रनरेटने सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबई इंडियन्स 4 गुणांसह आठव्या स्थानावर घसरली आहे. आतापर्यंतच्या मोसमात सर्वाधिक 5 विजय नोंदवणारा राजस्थान रॉयल्स 10 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज 8-8 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. सनराजर्स हैदराबाद 6 गुण आणि +0.344 च्या नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे.
इतर संघांची काय स्थिती?
लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. लखनौचा नेट रनरेट +0.038 आहे आणि गुजरातचा नेट रनरेट -0.637 आहे. यानंतर पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स 4-4 गुणांसह अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. पंजाबचा नेट रनरेट -0.218, मुंबईचा -0.234 आणि दिल्ली कॅपिटल्सचा नेट रनरेट -0.975 आहे. तिन्ही संघांनी आतापर्यंत 6-6 सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ गुणतक्त्यात तळाच्या 10व्या स्थानावर आहे. बेंगळुरूने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी फक्त 1 जिंकला आहे. बंगळुरुचे 2 गुण आहेत. आगामी काही दिवसांतच प्ले ऑफमच्या फेरीत कोणता संघ प्रवेश करेल, हे निश्चित होणार आहे.
Here’s how the Points Table looks like after 29 matches of #TATAIPL 2024 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2024
Does your favourite team feature in the Top 4? 🤔 pic.twitter.com/R7EPWTGyfR
आज बंगळुरु विरुद्ध हैदराबादचा सामना-
आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानात रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
संबंधित बातम्या:
रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट...; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!
टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान