Shubman Gill : शुभमन गिल मैदानावर पाऊल टाकताच एकही बॉल न खेळता शतक होणार, अनोखा विक्रम रचणार
GT vs DC : आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने येणार आहेत. या लढतीवर दिल्ली कॅपिटल्सचं स्पर्धेतील भविष्य अवलंबून आहे.
नवी दिल्ली :आयपीएलमध्ये (IPL 2024) गेल्या दोन मॅचमध्ये तीन शतकं पाहायला मिळाली आहेत. राजस्थान रॉयल्सचा सलामीवर यशस्वी जयस्वाल यानं शतकी खेळी करत टीमला विजय मिळवून दिला होता. काल झालेल्या मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंटस आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दोन शतकं झाली. लखनौकडून मार्कस स्टोइनिसनं शतक केलं तर, चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडनं शतक केलं. या तीन शतकांनंतर आयपीएलमध्ये शुभमन गिल (Shubman Gill) देखील अनोखं शतक करणार आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सचा होम ग्राऊंडवर पराभव दिल्ली कॅपिटल्सनं केला होता. या पराभवानंतर गुजरातनं कमबॅक करत पंजाब किंग्जला त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत केलं होतं.तर, दिल्ली कॅपिटल्सला विजयाचा सूर गवसला असं वाटत असताना सनरायजर्स हैदराबादनं दिल्लीला होम ग्राऊंडवर पराभूत केलं होतं.
आज शुभमन गिलच्या आयपीएल करिअरमधील शंभरावा सामना आहे. शुभमन गिलनं 8 मॅचमध्ये 298 धावा केल्या असून त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल करिअरचा विचार केला असता गिलनं 99 मॅचमध्ये 20 अर्धशतकांच्या जोरावर 3088 धावा केल्या आहेत. रिषभ पंतच्या नावावर तीन शतकांची नोंद असून देखील त्याची सर्वोच्च धावसंख्या 129 आहे.
शुभमन गिलकडे पहिल्यांदाच नेतृत्त्व
गुजरात टायटन्सला पहिल्याच हंगामात एकदा विजेतेपद आणि दुसऱ्या हंगामात उपविजेतेपद मिळवून देणारा हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे गेल्यानंतर गुजरात टायटन्सचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये नेतृत्त्व करण्याची शुभमन गिलची ही पहिलीच वेळ आहे. शुभमन गिलनं गतवर्षीच्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवली होती. आयपीएलच्या 2023 च्या 16 व्या पर्वात शुभमन गिलनं 17 मॅचमध्ये 890 धावा केल्या होत्या.
शुभमनच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्सची कामगिरी कशी राहिली?
गुजरात टायटन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 8 मॅच खेळलेल्या आहेत. गुजरात टायटन्सनं 4 मॅचमध्ये विजय मिळवला तर चार मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. गुजरात टायटन्सल प्लेऑफमध्ये जायचं असल्यास त्यांना राहिलेल्या मॅचेस मोठ्या फरकानं जिंकण्याची गरज आहे. आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येत आहेत. गुजरात टायटन्सला दिल्लीनं अहमदाबाद येथील मॅचमध्ये पराभूत केलं होतं. आज गुजरातच्या संघाकडे दिल्लीनं केलेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. गुजरात टायटन्स या संधीचा फायदा करुन घेणार का हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :
RCB साठी नियम वेगळे आहेत का? चेन्नई-लखनौ सामन्यादरम्यानच्या 'नो बॉल'वर आता वाद