Santosh Deshmukh Wife Beed : मला वाटतं मीच कुणाला मारून येऊ, संतोष देशमुखांच्या पत्नीचा आक्रोष
Santosh Deshmukh Wife Beed : मला वाटतं मीच कुणाला मारून येऊ, संतोष देशमुखांच्या पत्नीचा आक्रोष
गेल्या काही दिवसांपासून बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. तर सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नीला रामदास आठवले यांच्या समोरच संताप अनावर झाल्याचे दिसून आले.
संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख म्हणाल्या की, मला तर अक्षरशः असं वाटतंय की, मीच जाऊन कुणाकुणाला मारावे. मला इतकी वेदना सहन होत नाहीय. आम्ही काय पाप केलं होतं की, आमच्यावर ही वेळ आलेली आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर मला शासनाने सांगावे, मीच जाऊन त्यांना डायरेक्ट मारुन येईन, इतकी माझ्यात हिंमत वाटायला लागली आहे, असा संताप त्यांनी रामदास आठवले यांच्यासमोर व्यक्त केला.