एक्स्प्लोर

IPL 2024 DC vs SRH : ट्रेविस हेडचं रेकॉर्ड तासाभरात मोडलं, जॅक फ्रेजर मॅक्गर्कची 15 बॉलमध्ये फिफ्टी, हैदराबादची धुलाई

Jake Fraser McGurk : दिल्ली कॅपिटल्सकडून जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं वेगवान अर्धशतक झळकवलं आहे. यंदाच्या आयपीएलमधील ते वेगवान अर्धशतक ठरलं आहे.

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियमवर आज चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतोय. सनरायजर्स हैदराबादनं (Sun Risers Hyderabad) पहिल्यांदा फलंदाजी करतना 7 बाद 266 धावा केल्या. हैदराबादसाठी ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, नितीशकुमार रेड्डी आणि शाहबाझ अहमद यांनी षटकारांची आतिषबाजी केली. 266 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही.  पहिल्याच ओव्हरमध्ये इम्पॅक्ट प्लेअर पृथ्वी शॉ 16 धावा करुन बाद झाला. यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Captials) आक्रमक फलंदाजीची जबाबदारी जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं (Jake Fraser McGurk) घेतली. त्यानं सनरायजर्स हैदराबादच्या बॉलर्सची धुलाई केली.  ट्रेविस हेडनं सनरायजर्स हैदराबादसाठी 16 बॉलमध्ये अर्धशतक झळकवलं. तर, जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.  

जॅक फ्रेजर मॅक्गर्कचं दिल्लीसाठी वेगवान अर्धशतक

जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक वेगवान अर्धशतक केलं. मॅक्गर्कनं 15 बॉलमध्येच अर्धशतक पूर्ण केलं. मॅक्गर्कचं हे आयपीएलमधील तिसरं वेगवान अर्धशतक ठरलं आहे. यानंतर आक्रमक फलंदाजी करत असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मॅक्गर्क बाद  झाला. मॅक्गर्कनं 18 बॉलमध्ये 65 धावा केल्या यामध्ये त्यानं 7 सिक्स आणि 5 चौकारांच्या जोरावर 65 धावा केल्या.

यशस्वी जयस्वालनं सर्वात वेगवान अर्धशतक केलं आहे. त्यानं 13 बॉलमध्ये अर्धशतक 2023 मध्ये पूर्ण केलं होतं. त्यानंतर केएल. राहुलनं 14 बॉलमध्ये अर्धशतक 2018 मध्ये पूर्ण केलं होतं. तर पॅट कमिन्सनं  2022 मध्ये 14 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं.
 
दिल्लीसाठी मॅक्गर्कनं 15 धावांमध्ये वेगवान अर्धशतक केलं आहे. यापूर्वी क्रिस मॉरिसनं 17 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. पृथ्वी शॉनं 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 18 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं.रिषभ पंतनं मुंबई इंडियन्स विरुद्ध 18 बॉलमध्ये 50 धावा केल्या होत्या. जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध देखील चांगली फलंदाजी केली होती. मॅक्गर्क बाद झाल्यानंतर दिल्लीला धावसंख्येचा वेग कायम राखता आला नाही. 

अभिषेक पोरेल वगळता दिल्ली कॅपिटल्सच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. आजच्या मॅचमध्ये पुनरागमन करणारा डेव्हिड वॉर्नर देखील मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला, त्यानं 1 रन केली. ट्रिस्टन स्टब्स 10 धावांवर बाद झाला. 

ट्रेविस हेडचं रेकॉर्ड मोडलं

सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना आजच्याच मॅचमध्ये ट्रेविस हेडनं 16 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. आस्ट्रेलियाचाच फलंदाज असलेल्या जॅक फ्रेजर मॅक्गर्गनं 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे.  दिल्ली कॅपिटल्सनं यापूर्वीच्या दोन मॅचमध्ये विजय मिळवला होता. आजच्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं ठेवलेलं 266 धावांचं आव्हान दिल्ली पूर्ण करु शकणार का हे पाहावं लागेल. 

संबंधित बातम्या :

IPL 2024, SRH vs DC: 6 ओवर्समध्ये 125 रन्स, हैदराबादने आयपीएलचा इतिहास, भूगोल सगळंच बदलून टाकलं!

IPL 2024 Travis Head : 16 बॉलमध्ये 50 धावा, पहिल्या 3 षटकात 61, हेडने पुन्हा धू धू धुतले

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Sandeep Deshpande On Santosh Dhuri: बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Dharashiv Crime News: काका अन् आईच्या अनैतिक संबंधांची माहिती बापाला द्यायचा;13 वर्षीय पुतण्याला चुलत्यानं संपवलं, तुळजापूर हादरलं
काका अन् आईच्या अनैतिक संबंधांची माहिती बापाला द्यायचा;13 वर्षीय पुतण्याला चुलत्यानं संपवलं, तुळजापूर हादरलं
Embed widget