एक्स्प्लोर

IPL 2024, SRH vs DC: 6 ओवर्समध्ये 125 रन्स, हैदराबादने आयपीएलचा इतिहास, भूगोल सगळंच बदलून टाकलं!

Travis Head Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादच्या ओपनर्सनी दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई केली आहे. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडनं पॉवरप्लेमध्ये 125 धावा केल्या.

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज ट्रेविस हेड (Travis Head) आणि अभिषेक शर्माचं (Abhishek Sharma) वादळ पाहायला मिळालं. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कॅप्टन रिषभ पंतनं (Rishabh Pant) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. रिषभ पंतचा हा निर्णय सन रायजर्स हैदराबादच्या (Sun Risers Hyderabad) ओपनर्सनी चुकीचा ठरवला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं वादळी खेळी करत हैदराबादला दमदार सुरुवात करुन दिली.  ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं सहा ओव्हरमध्ये 125 धावा करत इतिहास रचला. पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या हैदराबादच्या नावावर नोंदवली गेली. यापूर्वी पॉवरप्लेमध्ये सर्वोच्च धावसंख्या 105 इतकी होती.  कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरेन आणि लायनच्या पॉवरप्लेमधील 105 धावांचं रेकॉर्ड ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं मोडलं.  आरसीबी विरुद्ध सुनील नरेननं 54 तर लायननं 49 धावा केल्या होत्या. 

अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडनं पॉवरप्लेमध्ये 125 धावा केल्या. यामध्ये ट्रेविस हेडनं 84 धावा केल्या. दुसरीकडे अभिषेक शर्मानं देखील 40 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये दिल्लीच्या बॉलर्सची अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडनं धुलाई केली. खलील अहमदनं एका ओव्हरमध्ये 19 धावा,ललित यादवनं  दोन ओव्हर्समध्ये 41 धावा, नॉर्खियानं एका ओव्हरमध्ये 22 धावा,  कुलदीप यादवनं 20 तर मुकेश कुमारनं 22 धावा दिल्या. 

पॉवरप्लेनंतर दिल्लीचं डॅमेज कंट्रोल

पॉवरप्लेनंतर दिल्ली कॅपिटल्सनं कमबॅक केलं. दिल्ली कॅपिटल्सचा बॉलर कुलदीप यादवनं हैदराबदच्या धावसंख्येची गती कमी केली. कुलदीप यादवनं अभिषेक शर्माला 46 धावांवर बाद केलं. यानंतर फलंदाजीला आलेला मार्क्रम देखील चांगली फलंदाजी करु शकला नाही. तो एक रन करुन बाद झाला. कुलदीप यादवच्या बॉलिंगवरच ट्रेविस हेड बाद झाला. यानंतर अक्षर पटेलनं हेनरिक क्लासेनला देखील बाद केलं. 

ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माची शतकी भागिदारी

हैदराबादच्या डावाची सुरुवात करणाऱ्या ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी दिल्लीच्या बॉलर्सला पॉवर प्लेमध्ये कमबॅक करुन दिलं नाही. सातव्या ओव्हरमध्ये हैदराबादला पहिला धक्का बसला. कुलदीप यादवनं अभिषेक शर्माला 46 धावांवर बाद केलं. अभिषेक शर्मानं 6 सिक्स आणि दोन चौकार मारले. ट्रेविस हेडनं 32 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 11 चौकार मारले. 

नितीश कुमार रेड्डी आणि शाहबाजची अर्धशतकी भागिदारी

हेनरिक क्लासेन 15 धावा करुन बाद झाला तेव्हा हैदराबादची धावसंख्या 4 बाद 154 अशी होती. यानंतर नितीशकुमार रेड्डी आणि शाहबाजनं अर्धशतकी भागिदारी करुन हैदराबादला 15 व्या ओव्हरमध्येच 200 धावांचा टप्पा पार करुन दिला.   

संबंधित बातम्या :

DC vs SRH IPL 2024: सनरायजर्स हैदराबादची आक्रमक सुरुवात, हेड शर्मापुढं दिल्लीच्या बॉलिंगचा पालापाचोळा

IPL 2024 Travis Head : 16 बॉलमध्ये 50 धावा, पहिल्या 3 षटकात 61, हेडने पुन्हा धू धू धुतले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Nasim Khan Security : माझ्यावर हल्ला करण्याचा कट, नसीम खान यांचा दावाSudhir Mungantiwar : मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं अमित शाहांनी कधीच म्हटलेलं नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget