(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rishabh Pant :रिषभ पंतचा महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट, धडाकेबाज खेळीनं टीकाकारांची तोंड बंद, पाहा व्हिडीओ
IPL 2024 DC vs GT : रिषभ पंतनं गुजरात टायटन्स विरुद्द आठ षटकार आणि पाच चौकार मारत 88 धावांची धडाकेबाज खेळी केली. मोहित शर्माला त्यानं हेलिकॉप्टर शॉट मारला.
नवी दिल्ली : आयपीएलमध्ये (IPL 2024) काल झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) चार धावांनी पराभूत केलं. दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 विकेटवर 224 धावा केल्या होत्या. गुजरात टायटन्सनं 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 220 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या 224 धावांमध्ये रिषभ पंतच्या 88 आणि अक्षर पटेलनं 66 धावा केल्या. रिषभ पंतनं आठ षटकार आणि पाच चौकार मारले. रिषभ पंतनं (Rishabh Pant Helicopter Shot) यामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट देखील मारला.
रिषभ पंतचा हेलिकॉप्टर शॉट
रिषभ पंतनं गुजरात टायटन्सच्या अखेरच्या ओव्हरमध्ये मोहित शर्माला चार षटकार आणि एक चौकार मारला. रिषभ पंतनं 43 बॉलमध्ये 88 धावा केल्या. त्यापूर्वी रिषभ पंतनं 34 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. त्यामध्ये त्यानं 4 षटकार आणि 4 चौकार मारले.
Jaise guru, waise shishya 🚁#DCvGT #TATAIPL #IPLonJioCinema #IPLinHindi pic.twitter.com/wBtuLmlqiv
— JioCinema (@JioCinema) April 24, 2024
रिषभ पंतनं यंदाच्या आयपीएलमधील तिसरं अर्धशतक झळकावलं. रिषफ पंतनं गुजरात टायटन्सच्या राशिद खान, नूर अहमद आणि मोहित शर्माच्या बॉलिंगवर जोरदार फटके मारले. मोहित शर्मा गुजरातकडून 16 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमध्ये रिषभ पंतनं महेंद्रसिंह धोनीचा ट्रेडमार्क शॉट असलेला हेलिकॉप्टर शॉट मारला.
रिषभ पंतनं यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कमबॅक केलं आहे. रिषभ पंतनं आणि अक्षर पटेलनं 113 धावांची भागिदारी केली. दिल्ली कॅपिटल्सला गुजरातच्या संदीप वॉरिअरनं तीन धक्के दिले होते. दिल्लीची अवस्था 3 बाद 44 अशी झाली होती. यानंतर रिषभ पंत आणि अक्षर पटेलनं 113 धावांची भागिदारी करुन डाव सावरला. रिषभ पंतनं 88 धावांची तर अक्षर पटेलनं 66 धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्सची गुणतालिकेत मोठी झेप
दिल्ली कॅपिटल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 9 मॅच खेळल्या आहेत. दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. दिल्लीनं पहिल्या पाचपैकी चार मॅच सामन्यात पराभव झाला होता. दिल्लीनं चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं होतं. पुढच्या चार मॅचमध्ये दिल्लीनं तीन विजय मिळवले आहेत. दिल्लीनं आठ गुण मिळवले असून ते गुणतालिकेत सध्या सहाव्या स्थानावर आहेत. रिषभ पंतनं ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील मोठी झेप घेतली आहे. रिषभ पंत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर विराट कोहली असून त्यानं 379 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानी ऋतुराज गायकवाड 348 धावा तर रिषभ पंतच्या 342 धावा आहेत.
संबंधित बातम्या :
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग