(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
DC vs GT, IPL 2024 : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात दिल्लीनं गुजरातचा चार धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकातील थरार पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
DC vs GT, IPL 2024 : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात दिल्लीनं गुजरातचा चार धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकातील थरार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गुजरातला अखेरच्या 6 चेंडूवर जिंकण्यासाठी 19 धावांची गरज होती. राशिद खान यानं पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार ठोकत शानदार सुरुवातही केली. पण मुकेश कुमारनं अनुभव पणाला लावत कमबॅक केले. प्रत्येक चेंडूगणिक सामना फिरत होता. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज होती, पण राशिद खान याला चेंडू सिमारेषावर पाठवण्यात अपयश आले. रोमांचक सामन्यात दिल्लीनं चार धावांनी विजय मिळवला. राशिद खान यानं 11 चेंडूत नाबाद 21 धावांची खेळी करत झुंज दिली, पण अपयश आले. पाहूयात अखेरच्या सहा चेंडूवर नेमकं काय काय झालं...
अखेरच्या षटकातील थरार...
19.1 - मुकेश कुमारच्या पहिल्याच चेंडूवर राशिद खानने चौकार ठोकला. गुजरातला 5 चेंडूत 15 धावांची गरज
19.2 - मुकेश कुमारच्या दुसऱ्या चेंडूवरही राशिद खानने चौकार ठोकला. गुजरातला चार चेंडूवर 11 धावांची गरज
19.3 - मुकेश कुमारनं फुलटॉस चेंडू फेकला, राशिदने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण अपयश आले. चेंडू पंतकडून सुटला पण राशिदने धाव घेतली नाही. गुजरातला 3 चेंडू 11 धावांची गरज
Rashid Khan - a legend of T20 Cricket! 👏
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 24, 2024
- Gave his best for GT, but fell just short. 🥲💔pic.twitter.com/dOMnDItQvx
19.4 - मुकेश कुमारनं यॉर्कर चेंडू टाकला, राशिद खान यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण अपयश आले. गुजरातला 2 चेंडूत 11 धावांची गरज
19.5 - मुकेश कुमारनं यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला, पण राशिद खान यानं लाँग ऑफवर षटकार ठोकला. गुजरातला एक चेंडूत 5 धावांची गरज
19.6 - अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती, मुकेश कुमारला राशिद खान यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू मिड विकेटवर गेला, पण एकही धाव घेता आली नाही.
ट्रिस्टन स्टबमुळेच दिल्ली विजयी -
19 व्या षटकात ट्रिस्टन स्टब यानं केलेल्या शानदार फिल्डिंगमुळेच दिल्लीचा विजय झाला. दिल्लीचा गोलंदाज रासिख याच्या पहिल्याच चेंडूवर साई किशोर चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू सिमापार गेला, असेच सर्वांना वाटलं. पण सिमारेषावर असणाऱ्या स्टब्स यानं हवेत झेपवत शानदार फिल्डिंग केली. स्टब्स यानं पाच धावा वाचवल्या. अखेरच्या चेंडूवर गुजरातला तेवढ्याच धावा जिंकण्यासाठी हव्या होत्या. स्टब्सनं शानदार फिल्डिंग केली नसती, तर कदाचीत निकाल वेगळा लागला असता. सोशल मीडियावर स्ट्रब्सच्या फिल्डिंगचं कौतुक होतेय.
Tristan Stubbs saved 5 runs.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 24, 2024
Delhi Capitals won by 4 runs. pic.twitter.com/IeQCezlmS9
दिल्लीचा चार धावांनी विजय -
अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सचा चार धावांनी पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातनं 8 विकेटच्या मोबदल्यात 220 धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून साई सुदर्शन आणि डेविड मिलर यांनी अर्धशतक ठोकत संघर्ष केला.