एक्स्प्लोर

IPL 2024 CSK vs RR: चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 142 धावांचं लक्ष्य; राजस्थानकडून रियान पराग एकटाच नडला!

IPL 2024 CSK vs RR: दोन्ही संघासाठी प्ले ऑफच्या दृष्टीने महत्वाचा सामना आहे. 

IPL 2024 CSK vs RR: राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात सध्या सामना सुरु आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी राजस्थानने 5 विकेट्स गमावत 141 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी 142 धावांचं आव्हान असणार आहे. दोन्ही संघासाठी प्ले ऑफच्या दृष्टीने महत्वाचा सामना आहे. 

राजस्थानकडून रियान परागने सर्वाधिक धावा केल्या. रियान परागने 35 चेंडूत 47 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. यशस्वी जैस्वालने 24, जॉस बटलरने 21, संजू सॅमसनने 15 आणि ध्रुव जुरेलने 28 धावा केल्या. चेन्नईकडून सिमरजीत सिंगने 3 विकेट्स पटकावल्या. तर तुषार देशपांडे 2 विकेट्स घेण्यात यशस्वी राहिला.

चेन्नई सुपर किंग्सची Playing XI:

रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (c), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश तिक्षणा

राजस्थान रॉयल्सची Playing XI:

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

MS धोनी आज निवृत्तीची घोषणा करणार?

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएल 2024 मधील आज घरच्या मैदानावर हंगामातील शेवटचा सामना खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत (RR) होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईने चाहत्यांना सामन्यानंतर मैदानावर थांबण्याची खास विनंती केली आहे, ज्याचा संबंध चाहते एमएस धोनीच्या (MS Dhoni) आयपीएल निवृत्तीशी जोडत आहेत. चेन्नईच्या या घोषणेनंतर अनेक चाहते भावूकही झाल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईचा राजस्थान विरुद्ध सामना होणार आहे. चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर चेन्नईचा हा शेवटचा सामना असेल. सामन्यापूर्वी, चेन्नईने सोशल मीडियावर कॅप्शनसह एक पोस्ट जारी केली, "सुपर चाहत्यांना खेळानंतर येथे थांबण्याची विनंती आहे!" पुढे लिहिले होते, "तुमच्यासाठी काही खास येत आहे." याशिवाय पोस्टरमध्ये चाहत्यांना सामना संपल्यानंतर थांबण्याची विनंतीही करण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

MS Dhoni: MS धोनी आज निवृत्तीची घोषणा करणार?; चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटची रंगली चर्चा, चाहते भावूक

ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!

चेन्नईने सामना गमावला, पण सर्वांना चीअरलीडरची पडली भुरळ; अभिनेत्रींना टक्कर देणारं सौंदर्य, पाहा Photo's

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
Embed widget