एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

फाफनं स्फोटक सुरुवात केली, पण एका धावेत तीन फलंदाज माघारी, मॅक्सवेलही फेल

IPL 2024, CSK vs RCB : फाफ डु प्लेसिसने चौकारांचा पाऊस पाडला. दीपक चाहरची गोलंदाजी फोडून काढली. पण चेन्नईनं जोरदार कमबॅक केले. फक्त एका धावांच्या अंतरात आरसीबीच्या तीन धुरंधर फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

IPL 2024, CSK vs RCB : चेपॉकच्या स्टेडियमवर सलामीच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यानं नाणेफेकीचा निर्णय घेतला. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आरसीबीच्या डावाची सुरुवात केली.  फाफ डु प्लेसिस यानं आरसीबीला आक्रमक सुरुवात करुन दिली. फाफ डु प्लेसिसने चौकारांचा पाऊस पाडला. दीपक चाहरची गोलंदाजी फोडून काढली. पण चेन्नईनं जोरदार कमबॅक केले. फक्त एका धावांच्या अंतरात आरसीबीच्या तीन धुरंधर फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. बिनबाद 41 वरुन... तीन बाद 42 अशी दैयनीय अवस्था आरसीबीची झाली. मुस्तफिजुर रहमान यानं एकाच षटकात आरसीबीच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 

नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबी प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. कर्णधार फाफ डु प्लेसिस यानं आक्रमक फलंदाजी केली. त्यानं एकापाठोपाठ एक चौकारांचा पाऊस टाकला. फाफ डु प्लेसिस यानं 8 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. फाफ डु प्लेसिस यानं 23 चेंडूत 35 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला विराट कोहली शांत आणि संयमी फलंदाजी करत होता. पण दुसऱ्या बाजूला एकापाठोपाठ एक विकेट पडल्या. मुस्तफिजुर रहमान यानं एकाच षटकात आरसीबीच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मुस्तफिजुरने आधी धोकादायक फाफ डु प्लेसिस याला 35 धावांवर बाद केले. त्यानंतर रजत पाटीदार याला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. रजत पाटीदार याला खातेही उघडता आले नाही. हे कमी होतं की काय म्हणून पुढच्याच षटकात मॅक्सवेलही बाद झाला. दीपक चाहर यानं ग्लेन मॅक्सवेल याला धोनीकरवी झेलबाद केले. 8 षटकानंतर आरसीबीने तीन बाद 55 धावा केल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीन खेळत आहेत. कॅमरुन ग्रीन 8 तर विराट कोहली 9 धावांवर खेळत आहे. 

चेन्नईकडून दीपक चाहर याने 3 षटकात 25 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली आहे. मुस्तफिजुर रहमान याने एका षटकात चार धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रवींद्र जाडेजा, महिश तिक्ष्णा, तुषार देशपांडे यांना विकेट घेण्यात अपयश आले. 

आरसीबीची प्लेईंग 11 - 

फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, मयांक डांगर, मोहम्मद सिराज, अल्जारी जोसेफ

चेन्नईची प्लेईंग 11 - 

रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, डॅरेल मिचेल, महिश तिक्ष्णा, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, दीपक चाहर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal PC FULL: 2-4 दिवसांत शपथविधी होईल,  छगन भुजबळांची माहितीSanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर?  संजय राऊतांचं मोठ वक्तव्यPuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चाPunekar on CM Maharashtra  : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Embed widget