IPL 2023 : कोहली आणि गांगुली यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर, विराटनं हँडशेक करणं टाळलं? सामन्यानंतरचा Video व्हायरल
Virat Kohli vs Sourav Ganguly : विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दिल्ली आणि आरसीबीचा (RCB vs DC) सामना संपल्यानंतर कोहलीने गांगुलीशी हात मिळवणं टाळलं असंही बोललं जात आहे.
Virat Kohli Refuses To Shake Hands With Sourav Ganguly : विराट कोहली (Virat Kohli) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 23 धावांनी पराभव केला. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यातील वादाची ठिणगी दिसून आळी. सामना संपल्यानंतर कोहलीने गांगुलीशी हात मिळवणं टाळलं असंही बोललं जात आहे. त्यामुळे कोहली आणि गांगुली यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
IPL 2023 : कोहली आणि गांगुली यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
आयपीएलमध्ये शनिवारी (15 एप्रिल) रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगला. या सामन्यात आरसीबीने 23 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने दमदार अर्धशतकी खेळी केली. याशिवाय त्याने तीन झेलही पकडले. दरम्यान, या सामन्यात कोहलीने कॅच पकडल्यानंतर दिलेली रिअॅक्शन व्हायरल होत आहे. तिसरा झेल घेतल्यानंतर विराट कोहलीने डग आऊटमध्ये असणाऱ्या गांगुलीकडे रागाने पाहत होत असं बोललं जात आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र, या व्हिडीओमध्ये विराटच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट दिसून येत नाहीयत.
IPL 2023 : कोहलीनं गांगुलीला हँडशेक करणं टाळलं?
या सामन्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू आणि कर्मचारी एकमेकांसोबत हात मिळवताना पाहायला मिळालं. पण यावेळी विराट कोहलीने दिल्ली संघाचा डायरेक्टर सौरव गांगुलीसोबत हात मिळवला नाही, असं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ :
Virat Kohli not a single handshake with Ganguly 👀 pic.twitter.com/3NcwSpZ6Mp
— Mein hoon (@AnkitSi47104319) April 16, 2023
विराट कोहलीने टी20 क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं, तेव्हापासून कोहली आणि गांगुली यांच्यातील वाद समोर आला. बीबीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं होतं की, कोहलीने कर्णधारपद सोडत असल्यातं जाहिर केल्यावर त्यांनी असं करण्यापासून कोहलीला रोखलं होतं. पण त्यानंतर कोहलीने यावर स्पष्टीकरण देत सांगितलं होतं की, गांगुलीने याबाबत कोणतीही चर्चा केली नाही. याशिवाय एकदिवसीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद काढून घेताना कोणतीही चर्चा केली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :