एक्स्प्लोर

KKR vs SRH, Match Highlights : रिंकू-नीतीशची वादळी खेळी व्यर्थ, हैदराबादचा कोलकात्यावर 23 धावांनी विजय

KKR vs SRH, Match Highlights: कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांनी शर्थीचे प्रयत्न केले पण ते कोलकात्याला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

KKR vs SRH, Match Highlights : ईडन गार्डन्स मैदानावर हैदराबादने कोलकात्याचा 23 धावांनी पराभव केला. 229 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याच्या संघाने निर्धारित 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 205 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांनी शर्थीचे प्रयत्न केले पण ते कोलकात्याला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. नीतीश राणा याने 75 धावांची खेळी केली तर रिंकू सिंह याने 58 धावांचे योगदान दिले. हैदराबादचा हा दुसरा विजय होय.. हैदराबादकडून मयांक मार्केंडेय आणि मार्को जानसन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, नटराजन, उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

229 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात गुरबाज शून्यावर बाद झाला.. भुवनेश्वर कुमार याने गुरबाजचा अडथळा दूर केला. त्यानंतर वेंकटेश अय्यर यालाही मोठी खेळी करता आली नाही. वेंकटेश अय्यर 10 धावांवर बाद झाला. सुनील नारायण याला खातेही उघडता आले नाही. त्याशिवाय आंद्रे रसेल याला मोठी खेळी करता आली नाही. रसेल तीन धावांवर बाद झाला. नारायण जगदीशन याने 36 धावांचे योगदान दिले. जगदीशन याने 21 चेंडूत 36 धावांची खेळी केली. यामध्ये पाच चौकार आणि एक षटकार लगावला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला कर्णधार नीतीश राणा याने धावांचा पाऊस पाडला. नीतीश राणा याने 41 चेंडूत 75 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने सहा षटकार आणि पाच चौकार लगावले. तर रिंकू सिंह याने पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाजी केली. रिंकू सिंह याने 31 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. यामध्ये चार षटकार आणि चार चौकार लगावले. रिंकू आणि नीतीश राणा फलंदाजी करत असताना कोलकाताला विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. पण मोक्याच्या क्षणी नटराजन याने नीतीश राणा याला बाद केले. त्यानंतर शार्दुल ठाकूरही 12 धावांवर तंबूत परतला. रिंकू सिंह याने 58 धावांची नाबाद खेळी केली. रिंकू आणि नीतीश राणा यांनी वादळी खेळी केली, पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे कोलकात्याला पराभवाचा सामना करावा लागला. 

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना हॅरी ब्रूक याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 228 धावांचा डोंगर उभारला. हॅरी ब्रूक याने विस्फोटक फलंदाजी करत 55 चेंडूत शतक झळकावले. हॅरी ब्रूक याने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले.  

हॅरी ब्रूकचे शतक 

हॅरी ब्रूक याने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने चारी बाजूने धावांचा पाऊस पाडला. हॅरी ब्रूक याने 55 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत ब्रूक याने तीन षटकार आणि 12 चौकार लगावले. हॅरी ब्रूक याने पावरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला.. त्यानंतर त्याने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. हॅरी ब्रूक याने माक्ररमसोबत तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अभिषेक शर्मासोबत चौथ्याविकेटसाठी 33 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. तर पावरप्लेमध्ये मयंक अग्रवालसोबत हॅरी ब्रूक याने 46 धावांची भागिदारी केली. अखेरीस कालसेनसोबत त्याने 11 चेंडूत 27 धावांची भागिदारी केली. 

एडन माक्ररमची कर्णधाराला साजेशी खेळी - 


हैदराबादचा कर्णधार एडन माक्ररम याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने 26 चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. माक्ररम याने या खेळीत पाच षटकार आणि दोन चौकार लगावले. माक्ररम याने विस्फोटक फलंदाजी करत हैदाराबादच्या डावाला आकार दिला. आघाडीच्या दोन विकेट झटपट गेल्यानंतर माक्ररम याने हॅरी ब्रूकच्या साथीने हैदराबादचा डाव सावरला.  हॅरी ब्रूक आणि माक्ररम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. यामध्ये माक्रमरचा वाटा 50 धावांचा होता. तर हॅरी ब्रूक फक्त 20 धावांचे योगदान दिले. 

अग्रवाल-त्रिपाठी फ्लॉप - 
मयंक अग्रवाल याला अद्याप सूर गवसलेला दिसत नाही. आजही मयंक अग्रवाल स्वस्ता बाद झाला. मयंक अग्रवाल याला फक्त 9 धावा काढता आल्या. यासाठी त्याने 13 चेंडू घेतले. मयंक आणि हॅरी ब्रूक यांनी पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागिदारी केली. पण यामध्ये हॅरी ब्रूक याचे मोठे योगदान होते. राहुल त्रिपाठीलाही आज मोठी खेळी करता आली नाही. त्रिपाठी फक्त 9 धावांवर बाद झाला. 

अभिषेक शर्माचे वादळ  -
एडन माक्ररम बाद झाल्यानंतर अभिषेख शर्मा याने वादळी फलंदाजी केली. अभिषेक शर्मा याने 17 चेंडूत 32 धावांची खेळी केली. या खेळीत अभिषेक शर्मा याने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. अभिषेक शर्मा याने हॅरी ब्रूक याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 33 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. अभिषेक शर्मा याने झटपट धावा काढल्यामुळे हैदराबादने 200 धावांचा पल्ला ओलांडला.

रसेलचा भेदक मारा - 
अष्टपैलू आंद्रे रसेल याने हैदराबादविरोधात भेदक मारा केला. त्याने हैदराबादच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. रसेल याने 2.1 षटकात 22 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. पण तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आंद्रे रसेल दुखापतग्रस्त झाला. रसेल याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे रसेल याला मैदान सोडावे लागले.

आंद्रे रसेल याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला अचूक टप्प्यावर मारा करता आला नाही. उमेश यादव याने तीन षटकात 42 धावा खर्च केल्या. लॉकी फर्गुसन याने दोन षटकात 37 धावा दिल्या. नारायण याने चार षटकात 28 धावा दिल्या.. पण विकेट एकही घेता आली नाही.  वरुण चक्रवर्ती याने चार षटकात 41 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. सुयेश शर्मा याने चार षटकात 44 धावा खर्च केल्या.  

आणखी वाचा :
Who is Harry Brook : यंदाच्या हंगामातील पहिले शतक, लिलावात 13.25 कोटींची बोली, कोण आहे हॅरी ब्रूक?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget