(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG vs SRH Playing 11 : हैदराबाद पराभवाचा वचपा काढणार? लखनौ विरुद्ध कशी असेल प्लेईंग 11
IPL 2023, SRH vs LSG: लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये 11 पैकी पाच सामने जिंकल्यानंतर, लखनौ सध्या आयपीएल क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे.
LSG vs SRH, IPL 2023 Match 58 : आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) आज 58 वा सामना रंगणार असून यामध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध मैदानात उतरणार आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये 11 पैकी पाच सामने जिंकल्यानंतर, लखनौ सध्या आयपीएल क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, सनराजयर्स हैदराबाद संघाने 11 पैकी केवळ चार सामने जिंकले असून संघ क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे.
LSG vs SRH, IPL 2023 : हैदराबाद पराभवाचा वचपा काढणार?
यंदाच्या आयपीएलमध्ये दहाव्या सामन्यात या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळाली होती. या सामन्यात लखनौने हैदराबादचा पराभव केला. आजच्या सामन्या हैदराबाद संघाला पराभवाचा वचपा काढण्याची संंधी मिळणार आहे.
The tug of #SRHvLSG war 🔥
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 12, 2023
Watch it live tomorrow from 3PM 🕒💥 pic.twitter.com/lmY5zX6c8z
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल
हैदराबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी काहीशी खडतर ठरू शकतो. येथील खेळपट्टीवर धावा करणे फलंदाजांसाठी काहीसे अवघड जातं. त्यामुळे या सामन्यांची दिशा गोलंदाजांवर अधिक अवलंबून असेल. या स्टेडिअमवर गोलंदाजांना मोठी भूमिका बजावण्याची अपेक्षा आहे.
पॉईंट टेबलची काय स्थिती?
गुजरातचा संघाने 12 सामन्यात आठ विजय मिळवलेत. गुजरात 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर धोनीचा चेन्नईने 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने 12 सामन्यात सात विजय मिळवलेत तर त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला होता. चेन्नईचे 15 गुण आहेत. मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. मुंबईने 12 सामनयात सात विजय मिळवलेत. राजस्थानचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरलाय. राजस्थानने 12 सामन्यात सहा विजय मिळवत 12 गुणांची कमाई केली आहे. त्याशिाय लखनौचा संघाने 11 सामन्यात 11 गुणांची कमाई केली आहे.
SRH vs LSG : कधी आणि कुठे रंगणार सामना?
आज हैदराबादच्या घरच्या मैदानावर म्हणजेच राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर हे दोन्ही संघ आमने-सामने येतील. दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. लखनौ सुपर जायंट्स संघाला त्यांच्या मागील सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद संघाने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.
LSG vs SRH, Probable Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
SRH Probable Playing 11 : सनरायझर्स हैदराबाद
अनमोलप्रीत सिंह, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
LSG Probable Playing 11 : लखनौ सुपर जायंट्स
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, आयुष बडोनी, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, स्वप्नील सिंह, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
SRH vs LSG Match Preview : लखनौ विरुद्ध हैदराबाद, प्लेऑफमध्ये कुणाला संधी? हेड टू हेड आकडेवारी पाहा