Knight Club App Launch: शाहरुख खानने KKR चाहत्यांना मोठी भेट, 'नाईट क्लब' अॅप केले लॉन्च
Knight Club App Launch: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सह-मालक शाहरुख खानने एक मजेदार व्हिडीओसह 'नाईट क्लब अॅप' लॉन्च केला आहे.
Knight Club App Launch: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सह-मालक शाहरुख खानने एक मजेदार व्हिडीओसह 'नाईट क्लब अॅप' लॉन्च केला आहे. 'एकदम फटाफटी अॅप' अशी त्याची टॅगलाइन आहे. केकेआरची क्षणाक्षणांची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचत राहावी, यासाठी हा अॅप आणण्यात आला आहे. या नाईटक्लब अॅप लॉन्चबद्दल केकेआरच्या मुख्य विपणन अधिकारी बिंदा डे यांनी सांगितले की, 'केकेआरचे त्याच्या चाहत्यांशी नेहमीच खास नाते राहिले आहे. कोरोना काळानंतर तीन वर्षांनंतर आम्ही आमच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर परतलो, तेव्हा आम्हाला आमच्या चाहत्यांसाठीची आमची बांधिलकी आणखी मजबूत करायची होती. नाईट क्लब अॅप KKR चा अनुभव आमच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांच्यासोबत ये णारा सर्व उत्साह जवळून वैयक्तिक शेअर करण्याचा आमचा मार्ग आहे.'
या अॅपच्या सर्वात रोमांचक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याचा लॉयल्टी प्रोग्राम आहे. जिथे चाहत्यांना KKR चे निष्ठावंत चाहते म्हणून बक्षीस मिळू शकते. चाहते अॅपमध्ये सामील होऊन पॉइंट मिळवू शकतात. यासोबतच काही लकी चाहत्यांना केकेआर नाईट्सला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळू शकते.
अॅपमध्ये एक गेम झोन देखील असेल. जेथे चाहते मॅच-डे गेममध्ये भाग घेऊ शकतात. अॅपमध्ये एक मेगास्टोअर देखील समाविष्ट असेल. जेथे चाहते अधिकृत KKR शी संबंधित वस्तू खरेदी करू शकतात आणि संघासाठी त्यांचा पाठिंबा दर्शवू शकतात. नाईट क्लब अॅप iOS आणि Android प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नितीश राणा केकेआरचा कर्णधार
View this post on Instagram
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या आगामी हंगामासाठी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने आपला कर्णधार जाहीर केला असून संघातील अनुभवी फलंदाज नितीश राणा (nitish rana) याला ही मोठी संधी देण्यात आली आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार असल्याने तो आयपीएलला मुकणार आहे. अशामध्ये संघाकडे बरेच पर्याय असताना नितीश राणाला जबाबदारी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का संघ व्यवस्थापनाने दिला आहे.
केकेआरची नवीकोरी जर्सी
View this post on Instagram