एक्स्प्लोर

मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली, यशस्वीचे दमदार शतक, राजस्थानची 212 धावांपर्यंत मजल

IPL 2023, MI vs RR : वानखेडेच्या मैदानावर मुंबईला विजयासाठी 213 धावांचे आव्हान आहे. 

IPL 2023, MI vs RR : यशस्वी जायस्वाल याच्या झंझावाती शतकाच्या बळावर राजस्थानने 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जायस्वाल याने 124 धावांची शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक होय.. तर मुंबईविरोधात दुसरे शतक आहे. वानखेडेच्या मैदानावर मुंबईला विजयासाठी 213 धावांचे आव्हान आहे. 

यशस्वी जायस्वालचा झंझावात - 

पहिल्या चेंडूपासून यशस्वी जायस्वाल याने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जायस्वाल याने दमदार शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक होय. हॅरी ब्रूक आणि वेंकटेश अय्यर यांच्यानंतर यशस्वी जायस्वाल याने शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, वेकंटेश अय्यर आणि यशस्वी जायस्वाल यांनी मुंबईविरोधात शतकी खेळी केली आहे. यशस्वी जायस्वाल याने आज मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली. यशस्वी जायस्वाल याने 62 चेंडूत 124 धावांची खेळी केली. या खेळीत जायस्वाल याने 8 खणखणीत षटकार लगावले. त्याशिवाय 16 चौकारही मारले आहेत. यशस्वी जायस्वाल याच्यानंतर राजस्थानकडून सर्वाधिक धावा अतिरिक्त आहेत. 124 धावांची खेळी करत यशस्वी जायस्वाल याने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. यशस्वी जायस्वाल याने 9 सामन्यात 428 धावांचा पाऊस पाडलाय.

इतर फलंदाजांचा फ्लॉप शो - 

यशस्वी जायस्वाल याचा अपवाद वगळता राजस्तानच्या एका फलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल आणि जेसन होल्डर प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. जोस बटलर याने 19 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगवाला, तर संजू सॅमसन याने एक चौकार आण एका षटकारासह 10 चेंडूत 14 धावांचे योगदान दिले. देवदत्त पडिक्कल अवघ्या दोन धावांवर तंबूत परतला. तर जेसन होल्डर याने एका षटकारासह 11 धावांचे योगदान दिले. हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनाही प्रभावी फलंदाजी करताना आली नाही. हेटमायर याने 9 चेंडूत 8 धावांचे योगदान दिले, यामध्ये एक षटकार लगावला. तर ध्रुव जुरेल दोन धावांवर बाद झाला. यशस्वी जायस्वाल याचा अपवाद वघळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. आर. अश्विन याने पाच चेंडूत नाबाद आठ धावांची खेळी केली.

फलंदाजांची कामगिरी पाहा - 

Batter   R B 4s 6s SR
c & b Arshad Khan 124 62 16 8 200.00
c (Sub) Ramandeep Singh b Piyush Chawla 18 19 2 1 94.74
c Tilak Varma b Arshad Khan 14 10 1 1 140.00
b Piyush Chawla 2 4 0 0 50.00
c Tim David b Jofra Archer 11 9 0 1 122.22
c Suryakumar Yadav b Arshad Khan 8 9 0 1 88.89
c Tilak Varma b Riley Meredith 2 3 0 0 66.67
not out 8 5 1 0 160.00
not out 0 0 0 0 -
Extras
( nb 1, w 16, b 1, lb 7, pen ) 25

मुंबईची गोलंदाजी कशी ?

पीयूष चावलाचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. चावलाने चार षटकात 34 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर जोफ्रा आर्चर, रायली मेरिडेथ यांनाही प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. अर्शद खान याने तीन फलंदाजांना तंबूत धाडले.  

Bowler   O R W Econ Dots
  3 31 0 10.33 10
  4 35 1 8.75 16
  4 51 1 12.75 7
  4 34 2 8.5 11
  2 14 0 7 6
  3 39 3 13 5
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget