MI vs CSK : मुंबईला रोहित पहिला विजय मिळवून देणार? CSK विरोधात असा आहे हिटमॅनचा रेकॉर्ड
Rohit Sharma Against CSK : रोहित शर्मा याने वानखेडे स्टेडिमवर खेळताना चेन्नईविरोधात 40 च्या सरासरीने आणि 135 च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडला आहे.
Rohit Sharma Against CSK : दोन वर्षानंतर मुंबईचा संघ वानखेडे मैदानावर खेळणार आहे. हा त्यांचा आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील दुसरा सामना असेल. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात आरसीबीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई आज पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. पण मुंबईला रोहित शर्मा पहिला विजय मिळवून देणार का? रोहित शर्माचे चेन्नईविरोधात आकडे काय म्हणतात.. पाहूयात...
चेन्नई सुपर किंग्सविरोधात रोहितची कामगिरी कशी?
मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारा सामना होय. दोन्ही संगामध्ये काटें की टक्कर पाहायला मिळते. चेन्नईविरोधात रोहित शर्माने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्मा याने वानखेडे स्टेडिमवर खेळताना चेन्नईविरोधात 40 च्या सरासरीने आणि 135 च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडला आहे. आज रोहित शर्मा चेन्नईविरोधात मोठी खेळी करत मुंबईला आयपीएल 16 च्या हंगमातील पहिला विजय मिळवून देणार का? याबाबत चर्चा सुरु आहे.
चेन्नई सुपर किंग्सविरोधात रोहित शर्माची वानखेडेवर कशी आहे कामगिरी?
87(48).
60(46).
39*(30).
19(19).
50(31).
19(14).
15(18).
13(18).
18(14).
पहिल्या सामन्यात रोहितची खराब कामगिरी -
आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात रोहित शर्माची बॅट शांत राहिली आहे. आरसीबीविरोधात रोहित शर्माला 10 चेंडूत फक्त 1 धावा करता आल्या. अशात चेन्नईविरोधात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे.
पहिल्या विजयासाठी मुंबई मैदानात उतरणार -
आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला आठ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता.. या सामन्यात मुंबईची गोलंदाजी फिकी पडली होती. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. आरसीबीने दोन विकेटच्या मोबदल्यात 172 धावांचे लक्ष आरामात पार केले होते. आज मुंबई आयपीएलच्या 16 व्या हंगमातील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन वर्षानंतर मुंबई आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्यातच आघाडीचा गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. आज अर्जुन तेंडुलकर आयपीएल पदार्पण करणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.
Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आयपीएल 2023 मध्ये 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबई संघाच्या खेळाडूंना वानखेडेवर खेळताना पाहायला मिळणार आहे. घरच्या मैदानावर दोन वर्षानंतर घरवापसी करत मुंबई इंडियन्स पहिला विजय मिळवून यंदाच्या मोसमात खातं उघडण्याचा प्रयत्न करेल. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 चा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही असाच प्रकार घडला आहे. येथील सपाट विकेटवर गोलंदाजांना विशेष मदत मिळत नाही. येथील सीमा लहान आहेत आणि आऊटफिल्ड खूप वेगवान आहे.