(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 Retention : मोठी बातमी! सनरायजर्स हैदराबाद संघाने कर्णधार केन विल्यमसनला केलं रिलीज!
Kane Williamson : आयपीएल 2023 मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून केन विल्यमसन मैदानात उतरणार नाही, कारण स्पर्धेपूर्वीच एसआरएचने त्याला रिलीज केलं आहे.
Kane Williamson News : आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेपूर्वी मिनी ऑक्शन होणार असून सध्या सर्व संघ आपले खेळाडू रिटेन आणि रिलीज करुन एक यादी बीसीसीआयकडे पाठवत आहेत. यादरम्यान सनरायजर्स हैदराबाद संघाने एक अत्यंत मोठा निर्णय घेत त्यांचा कर्णधार आणि स्टार खेळाडू केन विल्यमसन (Kane Williamson) याला रिलीज केलं आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ज्यामुळे आता आगामी आयपीएल 2023 मध्ये हैदराबादचं कर्णधारपद कोणाकडे असणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्ल्ड क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा फलंदाज ज्याचं नेतृत्त्व कायमच वाखाणण्याजोगं असतं असा न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन यंदा सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व करणार नाही. हैदराबाद संघाने केनला रिलीज केलं आहे. त्यामुळे तब्बल 8 वर्षे हैदराबाद संघासोबत घालवण्यानंतर आता केन आणि सनरायझर्स हैदराबाद संघ वेगळा होणार आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये हैदराबाद संघाचा सर्वात महागडा खेळाडू केन होता. त्यांनी त्याच्यासाठी 14 कोटी खर्च केले होते. पण 2022 मध्ये त्याने फार काही अप्रतिम कामगिरी केली नाही, तसंच संघही खास कमाल दाखवू शकला नाही. ज्यानंतर आता केनला रिलीज करण्यात आलं आहे. केनने हैदराबाद संघासाठी 76 सामने खेळत 36.22 च्या सरासरीने आणि 126.03 च्या स्ट्राईक रेटने 2 हजार 101 धावा केल्या आहेत. 46 वेळा त्याने संघाचं नेतृत्त्व केलं आहे.
View this post on Instagram
तर केन विल्यमसनसह हैदराबादने एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे आगामी आयपीएल 2023 च्या लिलावावेळी त्यांच्याकडे सर्वाधि म्हणजेच 42.25 कोटी असणार आहेत. तर हैदराबादने रिटेन आणि रिलीज केलेले खेळाडू नेमके कोणते जाणून घेऊ...
सनरायझर्सने रिलीज केलेले खेळाडू
केन विल्यमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमॅरियो शेफर्ड, सौरभ दुबे, शॉन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा आणि विष्णू विनोद.
कोणते खेळाडू अजूनही हैदराबादमध्ये
अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जेन्सन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि उमरान मलिक.
हे देखील वाचा-