IPL 2023 Retention: मुंबई, चेन्नईसह 10 संघांनी कोण कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज, पाहा एका क्लिकवर
IPL 2023 Retention: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सपासून श्रेयस अय्यरच्या कोलकाता संघानं काही खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
IPL 2023 Retention: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सपासून श्रेयस अय्यरच्या कोलकाता संघानं काही खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएलचा मिनी लिलाव पार पडणार आहे. त्यापूर्वी 15 नोव्हेंबरपर्यंत दहा संघाला खेळाडूंची अंतिम यादी द्यायची होती. मुंबई, आरसीबी, चेन्नईसह सर्वच संघानी आपली अंतिम यादी बीसीसीआयकडे दिली आहे. मुंबईनं संघानं पोलार्डला रिलीज करत सर्वांना धक्का दिला. तर हैदराबाद संघाने केन विल्यमसन आणि पंजाबने मयांक अग्रवाल यांना रिलीज केलेय. पाहूयात कोणत्या संघानं कुणाला रिलीज केलें.
हार्दिक पांड्याच्या गुजरातने कुणाला केलं रिलीज -
रहमानुल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्यूसन या दोन खेळाडूंना दिल्लीनं कोलकाता संघाला ट्रेड केले होतं. आज अखेरच्या दिवशी गुजरातने डोमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंह, जेसन रॉय, वरुण एरॉन यांना रिलीज केलेय.
मुंबईने 13 खेळाडूंना केले रिलीज -
कायरन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंह, आर्यन जुयाल, बसिल थंपी, डॅनिएल सॅम्स, फॅबिएन ऐलन, जयदेव उनादकट, मयंक मर्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रायली मेरेडिथ, संजय यादव आणि टायमल मिल्स या खेळाडूंना मुंबईनं रिलीज केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सने ड्वेन ब्रावोसह आठ खेळाडूंना केलं रिलीज -
ड्वेन ब्रावो, एडम मिल्ने, क्रिस जॉर्डन, नारायण जगदीशन, सी. हरि निशांत, के भगत वर्मा, केएम आसिफ, रॉबिन उथप्पा (रिटायर) या खेळाडूंना चेन्नईनं रिलीज केलेय.
पंतच्या दिल्ली संघानं कुणाला दाखवला घरचा रस्ता?
गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूरला दिल्लीनं कोलकाता संघासोबत ट्रेडिंग केलं आहे. त्याशिवाय टिम सेफर्ट, अश्विन हेब्बार, श्रीकर भरत, मनदीप सिंह यांनाही दिल्लीनं घरचा रस्ता दाखवलाय.
आरसीबीनं कुणाला दिला डच्चू?
आरसीबीनं आगागी आयपीएलपूर्वी काही जणांना रिलीज केले आहे. यामध्ये लवनीथ सिसोदिया, अनीश्वर गौतम, चामा मिलिंद आणि शेर्फेन रदरफोर्ड यांचा समावेश आहे. जेसन बेहरेन्ड्रॉफ याला ट्रेडिंगद्वारे अधीच मुंबईला दिलं आहे. आरसीबीची रिलीज खेळाडूंची यादी पाहता त्यांनी फक्त रदरफोर्ड या एकाच मोठ्या खेळाडूला रिलीज केलेय.
केकेआरचा अनेक खेळाडूंना धक्का -
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघानं अनेक दिग्गज खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्स, अमन खान, शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, अॅरोन फिंच, एलेक्स हेल्स, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, प्रथम सिंह, रमेश कुमार, रसिख सलाम आणि शेल्डन जॅक्सन यांचा समावेश आहे.
सनरायजर्स हैदराबादने 12 खेळाडूंना दाखवला घरचा रस्ता, विल्यमसनचा समावेश
सनरायजर्स हैदराबाद संघानं 12 खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये केन विल्यमसन याचाही समावेश आहे. त्याशिवाय निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन एबॉट, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा आणि विष्णु विनोद या खेळाडूंचा समावेश आहे.
मयांकसह अनेकांना पंजाबचा धक्का
मयंक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोडा, बेन्नी हॉवेल, ईशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मांकड, संदीप शर्मा, ऋतिक चटर्जी या खेळाडूंना पंजाबने रिलीज केलेय.
लखनौ सुपर जॉइंट्स संघानं कुणाला केलं रिलीज-
अँड्रयू टाय, अंकित राजपूत, दुशमंथा चमीरा, एविन लुईस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीम
राजस्थान संघानं कुणाला सोडलं?
डॅरेल मिचेल, रासी वॅन डेर डूसन, अनुनय सिंह, कॉर्बिन बॉश, जेम्स नीशम, करुण नायर, नाथन कूल्टर नायल, शुभम गढवाल, तेजस बरोका.
IPL Retention – कोणत्या संघाकडे किती पैसे राहिले?
दिल्ली - INR 19.45 कोटी
राजस्थान : INR 13.2 कोटी
आरसीबी: INR 8.75 कोटी
लखनौ: INR 23.35 कोटी
गुजरात : INR 19.25 कोटी
कोलकाता : INR 7.05 कोटी
पंजाब किंग्स: INR 32.2 कोटी
चेन्नई सुपर किंग्स: INR 20.45 कोटी
सनराइजर्स हैदराबाद: INR 42.25 कोटी
मुंबई : INR 20.55 कोटी