KGF चं वादळ! आरसीबीचे लखनौसमोर 213 धावांचे आव्हान
IPL 2023, RCB vs LSG : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांच्या तुफानी खेळीपुढे लखनौची दाणादाण उडाली.
IPL 2023, RCB vs LSG : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांच्या तुफानी खेळीपुढे लखनौची दाणादाण उडाली. आरसीबीने निर्धारित 20 षटकात दोन गड्यांच्या मोबद्लायत 212 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी अर्धशतकी खेळी केली. लखनौकडून एकाही गोलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी शतकी भागिदारी केली. लखनौला विजयासाठी 213 धावांची गरज आहे.
विराटची दमदार सुरुवात -
लखनौविरोधात विराट कोहलीने झंझावाती खेळी करत अर्धशतक झळकावले. नाणेफेक गमावल्यानंतर विराट कोहलीने फाफ डु प्लेसिससोबत पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. विराट कोहलीने 44 चेंडूत 66 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत विराट कोहलीने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. विराट कोहलीने फाफसोबत 96 धावांची सलामीची भागिदारी केली. विराट कोहलीने लखनौच्या प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहलीने 35 चेंडूत अर्धशतक झळकावले. विराट कोहलीच्या बॅटमधून पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडला. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विराट कोहलीने दुसरे अर्धशतक झळकावले. मुंबईविरोधात नाबाद 82 धावांची खेळी केली होती. त्यानंतर कोलकात्याविरोधात तो लवकर तंबूत परतला होता. कोलकात्याविरोधात विराट कोहलीने 21 धावांची छोटेखानी खेळी केली होती. आज पुन्हा एकदा विराट कोहलीने अर्धशतक झळकावत आरसीबीच्या धावसंख्येला आकार दिला. विराट कोहलीने अर्धशतक झळकावत आरसीबीच्या धावसंख्येचा पाया रचला. आशिया कप 2022 पासून विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्मात परतलाय. विराट कोहलीच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतोय. विराट कोहलीने आयपीएलच्या तीन सामन्यात 164 धावा केल्या आहेत. मुंबईविरोधात 49 चेंडूत 82 धावा केल्या होत्या. कोलकात्याविरोधात 18 चेंडूत 21 धावा चोपल्या होत्या. आज 44 चेंडूत 61 धावा चोपल्या.
फाफ डु प्लेसिसचे अर्धशतक -
विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी वादळी खेळी केली. विराट कोहलीनंतर फाफ डु प्लेसिस यानेही अर्धशतकी खेळी केली. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने अवघ्या 35 चेंडूत अर्धशतक झळकावले. विराट कोहली फलंदाजी करत असताना फाफ डु प्लेसिस दुसऱ्या बाजूला संयमी फलंदाजी करत होता. विराट कोहली बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेसिस याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. फाफ डु प्लेसिस याने एक षटकार तर 115 मीटर लांब मारला. फाफचा षटकार पाहून मॅक्सवेलही आश्चर्यचकीत झाला होता. फाफ डु प्लेसिस याने 46 चेंडूत नाबाद 79 धावांची खेळी केली. या खेळीत फाफने पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. फाफने विराट कोहलीसोबत 96 तर ग्लेन मॅक्सवेलसोबत शतकी भागिदारी केली.
ग्लेनचा बिग शो -
ग्लेन मॅक्सवेल याने वादळी फलंदाजी केली. मॅक्सवेल याने 29 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेल याने 6 षटकार आणि तीन चौकार लगावले. मॅक्सवेलच्या वादळी खेळीमुळे आरसीबीने 200 धावांचा पल्ला पार केला. ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांच्यासमोर लखनौची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. लखनौकडून मार्क वूड आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.