IPL 2023 Playoffs: 2 दिवस, 4 सामने अन् सहा संघ... प्लेऑफची स्पर्धा रंगली
IPL 2023 Playoffs : पंजाबचा पराभव करत राजस्थान संघाने प्लेऑफमधील आव्हान जिंवत ठेवलेय.
IPL 2023 Playoffs : पंजाबचा पराभव करत राजस्थान संघाने प्लेऑफमधील आव्हान जिंवत ठेवलेय. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा गुजरात एकमेव संघ आहे. साखळी फेरीतील चार सामने शिल्लक आहे... यामधून तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत. दोन दिवसांत चार सामने अन् तीन संघाचे भवितव्य ठरणार आहे. दिल्ली, हैदराबाद आणि पंजाब या संघाचे प्लेऑफमधील आव्हान संपले आहे. यामध्ये पंजाबचे 14 सामने झाले आहेत. तर हैदराबाद आणि दिल्ली यांचा प्रत्येकी एक एक सामना बाकी आहे. दिल्ली आणि हैदराबाद अखेरच्या सामना जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलीत.. या दोन्ही संघाने विजय मिळवल्यास प्लेऑफची स्पर्धा रंजक होणार आहे. सध्या गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई, लखनौ आणि आरसीबी अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे.
आतापर्यंत साखळी फेरीचे 67 सामने झाले आहेत... यामध्ये फक्त गुजरात या संघाला प्लेऑफचे तिकिट मिळालेय. इतर तीन स्थानासाठी सहा संघामध्ये स्पर्धा सुरु आहे. यामध्ये चेन्नई, लखनौ, आरसीबी, मुंबई, राजस्थान, कोलकाता या संघाचा समावेश आहे. दोन दिवसात चार सामने होणार आहेत... त्यानंतरच प्लेऑफमधील अंतिम संघाची नावे समोर येतील.
चेन्नई आणि लखनौने आपले साखळी सामने जिंकले तर ते थेट क्वालिफाय होतील... पण जर त्यांचा पराभव झाला. तर रविवारी होणाऱ्या सामन्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. चेन्नईचा अखेरचा साखळी सामना दिल्लीबरोबर आहे... तर लखनौचा सामना कोलकात्याशी होणार आहे.
आरसीबी आणि मुंबई यांच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष -
राजस्थानचा दारुण पराभव करत रनरेनट सुधाराला होता. तर हैदराबादचा पराभव करत आरसीबीने प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवले.. आता आरसीबीचा अखेरचा सामना टेबलटॉपर गुजरातसोबत होणार आहे. आरसीबीसाठी जमेची बाजू म्हणजे... हा सामना बेंगलोरमध्ये होत आहे. गुजरात आणि आरसीबीचा हा अखेरचा साखळी सामना असेल. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला अखेरचा सामना जिंकणे अनिवार्य आहे..
मुंबई इंडियन्सचा संघही प्लेऑफच्या स्पर्धेत आहे. पण मुंबईचे प्लेऑफचे आव्हान खडतर आहे... मुंबईने 13 सामन्यात 14 गुण आहेत.. पण नेट रटरेट -0.128 इतका आहे. मुंबईला अखेरचा साखळी सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. अथरा आरसीबी, चेन्नई अथवा लखनौ या तिन्हीपैकी एका संघाचा पराभव व्हायला हवा.
राजस्थान आणि कोलकाता हे दोन्ही संघ प्लेऑफच्या स्पर्धेत आहेत. कोलकाताने अखेरच्या साखळी फेरीत मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास अन् इतर संघाचा पराभव झाल्यास प्लेऑफचे तिकिट मिळू शकते.