PBKS vs RR, 1st Innings Highlights : सॅम करन आणि जितेश शर्माची संयमी खेळी, पंजाबचं राजस्थानला 188 धावांचं आव्हान
IPL 2023, PBKS vs RR : पंजाब संघाने पाच गडी गमावून 187 धावांचा पल्ला गाठला. पंजाब किंग्सनं राजस्थान रॉयल्सला 188 धावांचं लक्ष्य दिलं आहे.
PBKS vs RR, 1st Innings Highlights : राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार संजू सॅमसनने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्स संघाची सुरुवात खराब झाली. पंजाब संघाने पाच गडी गमावून 187 धावांचा पल्ला गाठला. पंजाब किंग्सनं राजस्थान रॉयल्सला 188 धावांचं लक्ष्य दिलं आहे. पावर प्लेमध्ये पंजाबच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांनी पुरतं नमवलं.
पंजाबचं राजस्थानला 188 धावांचं आव्हान
पंजाब किंग्सकडून सॅम करनने 31 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. जितेश शर्माने 44 आणि शाहरुख खानने 23 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. अथर्व तायडेने 19 आणि शिखर धवनने 17 धावांचे योगदान दिलं. लियाम लिव्हिंगस्टोनने नऊ आणि प्रभसिमरन सिंगने दोन धावा केल्या. राजस्थानकडून नवदीप सैनीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याने अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना बाद केलं. ट्रेंट बोल्ट आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळालं.
1⃣8⃣7⃣ to defend in Dharamshala!
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 19, 2023
It's time for a 𝙍𝙤𝙮𝙖𝙡 performance from our bowlers!#PBKSvRR #JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #TATAIPL pic.twitter.com/7fvh3Ls0lK
पहिल्याच षटकात पंजाबला पहिला झटका बसला. बोल्ड उत्तम गोलंदाजी करताना दुसऱ्या चेंडूवर प्रभसिमरन सिंहला झेलबाद केलं. प्रभासिमरनला दोन चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. पंजाबने तीन षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 30 धावा केल्या. त्यानंतर अथर्व तायडे आणि शिखर धवनकडे मोर्चा सांभाळण्याची जबाबदारी आली.
गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या अथर्व तायडेने या सामन्यातही चांगली सुरुवात केली, मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अथर्व तायडेला नवदीप सैनीने तायडेला देवदत्त पडिक्कलकडून झेलबाद केलं. तायडेने 12 चेंडूत 19 धावा केल्या. त्याने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावले.
पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली 50 धावांवर पंजाब किंग्सच्या चार गडी बाद झाले. आघाडीच्या फळीतील चार फलंदाजांनी संघाची निराशा केली आहे. मागील सामन्यात स्फोटक खेळी खेळणारा कर्णधार शिखर धवन आणि लियाम लिव्हिंगस्टोनही थोडक्यात बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतले. सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अॅडम जम्पाने धवनला एलबीडब्ल्यू केलं. धवनने 12 चेंडूत 17 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर, सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर लिव्हिंगस्टोन नवदीप सैनीने क्लीन बोल्ड झाला. लिव्हिंगस्टोनला 13 चेंडूत केवळ नऊ धावा करता आल्या.