एक्स्प्लोर

IPL 2023 : आयपीएल 2023 पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, जोफ्रा आर्चरनं सुरु केली प्रॅक्टिस, VIDEO

Mumbai Indians : आगामी आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने 13 खेळाडूंना रिलीज केलं पण स्टार खेळाडू जोफ्रा आर्चरला त्यांनी कायम ठेवलं आहे.

IPL 2023, Mumbai Indians : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चषक उंचावलेला संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. खासकरुन त्यांची गोलंदाजीची बाजू कमकुवत दिसून येत होती. त्यात मेगा लिलावाच त्यांनी जोफ्रा आर्चरला तब्बल 8 कोटी रुपये देऊन खरेदी केलं. तो दुखापतग्रस्त असूनही त्याला इतकी रक्कम देऊन मुंबईनं खरेदी केलं होतं. पण तो एकही सामना खेळू शकला नाही. पण आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) जोफ्रा दुखापतीतून सावरत असल्याचं समोर येत आहे. 

दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर असलेला इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आता बर्‍यापैकी दुखापतीतून सावरला असून तो आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार अशी दाट शक्यता आहे. जोफ्राने गोलंदाजीचा सरावही सुरू केला असून. जोफ्रा त्याच नेटमध्ये सराव करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जोफ्रा पुन्हा आपल्या जुन्या लयीत परतताना दिसत आहे.

पाहा VIDEO-

View this post on Instagram
 
A post shared by England's Barmy Army (@englandsbarmyarmy)

मुंबईनं रिलीज केलं 13 खेळाडूंना

मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबई पूर्णपणे नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. लिलावासाठी मुंबईकडे 20.55 कोटी रुपये शिल्लक असून पोलार्ड सारख्या दिग्गज खेळाडूलाही संघानं अलविदा केलं आहे. तर मुंबईने कोणते खेळाडू रिलीज आहेत आणि कोणते खेळाडू अद्याप संघात आहेत ते जाणून घेऊया.

मुंबईनं रिलीज केलेले खेळाडू

कायरन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बेसिल थंपी, डॅनियल सायम्स, फॅबियन ऍलन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरेडिथ, संजय यादव आणि टायमल मिल्स.

कोणते खेळाडू अजूनही मुंबई इंडियन्समध्ये

रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल

आगामी ऑक्शनसाठी कशी असेल मुंबईची रणनीती?

मुंबई लिलावात 20.55 कोटी रुपये घेणार असून एक मिनी ऑक्शनसाठी ही रक्कम एक मोठी रक्कम आहे. पण आयपीएल 2022 मधील अनुभव पाहता मुंबईला खेळाडूंच्या निवडीत हुशारी दाखवावी लागणार आहे. सध्या त्यांच्याकडे तीन परदेशी खेळाडूंसाठी जागा आहे. भारतीय खेळाडूंसाठीही बरीच जागा असून लिलावात मुंबईला चांगले मधल्या फळीतील फलंदाज आणि फिनिशर खेळाडू शोधण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्यात पोलार्डची जागा भरून काढणं सोपं काम नसणार आणि गोलंदाजीतही फिरकीपटू मुंबईला गरजेचे आहेत.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Embed widget