(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kumar Kartikeya : चेन्नईकडून पराभवानंतरही कुमार कार्तिकेयची चर्चा, मुंबई इंडियन्सकडून कौतुकाची थाप; 'हे' आहे कारण
IPL 2023, MI Kumar Kartikeya : मुंबई इंडियन्सने कुमार कार्तिकेयला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संधी दिली. पॉवर प्ले संपल्यानंतर कार्तिकेय मैदानावर आला आणि त्याने एक विकेट घेतली.
IPL 2023 Mumbai Indians Impact Player Kumar Kartikeya : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या (Chennai Super Kings) सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians ) सात विकेट्स पराभव झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सवर चेन्नई संघ वरचढ ठरला. पण मुंबईच्या काही खेळाडूंनी उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी केली. मुंबईकडून ईशान किशनने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर फलंदाजीमध्ये कुमार कार्तिकेयने लक्ष वेधलं. मुंबई इंडियन्सने कुमार कार्तिकेयला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संधी दिली. पॉवर प्ले संपल्यानंतर कार्तिकेय मैदानावर आला. त्याने एक विकेट घेतली.
पराभवानंतरही मुंबई इंडियन्सच्या कुमार कार्तिकेयची चर्चा
पॉवर प्ले संपल्यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेय गोलंदाजीसाठी मैदानावर उतरला. त्याने टीम डेव्हिडची जागा घेतली. इम्पॅक्ट प्लेयर कुमार कार्तिकेयने चौदाव्या ओव्हरमध्ये शिवम दुबेची जबरदस्त विकेट घेतली. यामुळे पराभवानंतरही कार्तिकेयचं कौतुक होत आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या ड्रेसिंग रुममध्येही कुमार कार्तिकेयचं भरभरून कौतुक करण्यात आलं. त्याला मुंबई इंडियन्स संघाचा 'प्लेअर ऑफ द मॅच' निवडण्यात आलं. मुंबई इंडियन्सने याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ :
Came in as an impact player & bowled a tight spell 👏
— Mumbai Indians (@mipaltan) April 9, 2023
Kartikeya gets the dressing room POTM 🎖️#OneFamily #MIvCSK #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @Imkartikeya26 MI TV pic.twitter.com/7jbdoKZkCF
⚠️ Impact Player Alert!
— Mumbai Indians (@mipaltan) April 8, 2023
Tim 🔁 KK #OneFamily #MIvCSK #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @Imkartikeya26 @timdavid8 pic.twitter.com/y9TCvr3wx4
चेन्नईचा मुंबईवर सात विकेट्सने विजय
वानखेडेच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा सात विकेटने पराभव करत वस्त्रहरण केलेय. आधी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवले, त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. मुंबईने दिलेले 158 धावांचे माफक आव्हान चेन्नईने सात विकेट आणि 11 चेंडू राखून आरामात पार केले. मराठमोळ्या अजिंक्य राहणे याने या सामन्यात झंझावाती फलंदाजी केली. तर रविंद्र जाडेजाने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील चेन्नईचा हा दुसरा विजय ठरला तर हा मुंबईचा दुसरा पराभव आहे.