RCB vs LSG Playing 11 : विराट कोहली आणि केएल राहुल आमने-सामने, दोन्ही संघांची प्लेईंग 11 आणि खेळपट्टी कशी असेल?
LSG vs RCB Pitch Report : आज लखनौच्या इकाना स्टेडिअमवर लखनौ (Lucknow Super Giants) विरुद्ध बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन संघात सामना रंगणार आहे.
IPL 2023, LSG vs RCB Match 42 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज लखनौच्या इकाना स्टेडिअमवर लखनौ (Lucknow Super Giants) विरुद्ध बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन संघात सामना रंगणार आहे. यंदाच्या मोसमातील 15 व्या सामन्यात या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळाली होती. बंगळुरुच्या घरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर त्यांना लखनौकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी बंगळुरु संघ सज्ज झाला आहे. लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाने शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात शानदार विजय मिळवला. तर दुसरीकडे मागील सामन्यात आरसीबी संघाचा कोलकाताकडून पराभव झाला.
विराट कोहली आणि केएल राहुल आमने-सामने
आज लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल आमने-सामने असतील. लखनौ संघाने शेवटच्या सामन्यात 257 धावांचा डोंगर रचला होता. ही आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वाधिक धावसंख्या आहे. यामध्ये मार्कस स्टॉइनिस, काइल मेयर्स आणि निकोलस पूरन यांनी चांगली खेळी केली. दुसरीकडे, बंगळुरूकडून मागील सामन्यात विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल व्यतिरिक्त, इतर कोणत्याही फलंदाजाला स्वतःला सिद्ध करता आलं नाही. गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराजने आणि वानिंदू हसरंगाने चांगली कामगिरी केली आहे.
Ekana Stadium Lucknow Pitch Report : इकाना खेळपट्टी कशी आहे?
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम (Ekana Stadium) ची खेळपट्टी टी20 च्या दृष्टीने येथील खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजीसोबतच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.
LSG vs RCB Probable Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11
LSG Probable Playing 11 : लखनौ सुपर जायंट्स
केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, आयुष बडोनी, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), नवीन-उल-हक, आवेश खान, यश ठाकूर, रवी बिश्नोई.
RCB Probable Playing 11 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
विराट कोहली (ककर्णधार), फाफ डू प्लेसिस, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या इतर बातम्या :