एक्स्प्लोर

LSG vs RCB Match Preview : आरसीबी पराभवाचा वचपा काढणार? लखनौ आणि बंगळुरुमध्ये लढत, पाहा हेड टू हेड आकडेवारीमध्ये कुणाचं पारड जड...

RCB vs LSG, IPL 2023 Match 43 : आयपीएल 2023 च्या आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

IPL 2023 Match 43, LSG vs RCB Match Prediction : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. लखनौच्या घरच्या मैदानावर आजचा सामना रंगणार आहे. ईकाना स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएल गुणतालिकेत लखनौ संघ सध्या दुसऱ्या स्थानावर तर बंगळुरु सहाव्या स्थानावर आहे. यंदाच्य आयपीएलच्या सोळाव्या हंगाातील हा 43 वा सामना असेल. आयपीएल 2023 मधील 15 व्या सामन्यात बंगळुरुला लखनौ संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बंगळुरु संघ तयार झाला आहे.

LSG vs RCB, IPL 2023 : लखनौ आणि बंगळुरुमध्ये लढत

लखनौ संघाने मागील सामन्यात पंजाब किंग्सवर विजय मिळवला. तर दुसरीकडे बंगळुरु संघाला मागील सामन्यात कोलकाताकडून पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. तर लखनौ सुपर जायंट्स संघ विजयी मोहित कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. लखनौ संघाने आतापर्यंत आठ पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर आरसीबी संघाने आठपैकी चार सामने जिंकले आहेत.

LSG vs RCB Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा 

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) या दोन संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरु (RCB) संघाचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं. आरसीबीने तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत तर लखनौ (LSG) संघाला एक सामना जिंकण्यात यश मिळालं. दोन्ही संघांची सरासरी सर्वाधिक धावसंख्या 200 आहे.

RCB vs LSG  IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात आज, 01 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना लखनौमधील ईकाना स्टेडियमवर (Ekana Sports City Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Points Table : विजयासह मुंबई आणि पंजाबची गुणतालिकेत उडी; पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget