एक्स्प्लोर

LSG vs DC, Pitch Report : लखनौच्या घरच्या मैदानावर दिल्लीची कसोटी, खेळपट्टी आणि प्लेईंग 11 बाबत जाणून घ्या...

Lucknow Super Giants vs Delhi Capitals Match : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मधील दुसरा डबल हेडर (IPL Double Header) सामना दिल्ली आणि लखनौ यांच्यात रंगणार आहे.

DC vs LSG Match 3 Prediction : आज इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League) मधील दुसरा दुसरा डबल हेडर सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात रंगणार आहे. हा सामना 1 एप्रिल रोजी लखनौमधील स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि लखनौ या दोन्ही संघाचा यंदाच्या हंगामातील आज पहिला सामना आहे. दोन्ही संघ आयपीएल 2023 ची विजयी सुरुवात करण्याचं लक्ष्य बाळगून मैदानात उतरतील. हा आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधील तिसरा सामना आहे. खेळपट्टी आणि प्लेईंग 11 बद्दल जाणून घ्या...

IPL 2023 DC vs LSG : दिल्ली आणि लखनौ यांच्यात रणसंग्राम

आज लखनौच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. लखनौ संघाचा हा दुसरा आयपीएल सीझन आहे. 2022 च्या आयपीएलमध्ये लखनौ संघाने पदार्पण केलं. 

DC vs LSG, Pitch Report : खेळपट्टीचा अहवाल

लखनौ आणि दिल्ली यांच्यातील हा सामना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर होणार आहे. टी 20 च्या दृष्टीने येथील खेळपट्टी खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजांबरोबरच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.

DC vs LSG, Head to Head : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 

आयपीएलमध्ये लखनौ आणि दिल्ली यांच्यात आतापर्यंत एकूण 2 सामने झाले असून दोन्ही सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सने विजय मिळवला आहे. लखनौविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दिल्लीला 6 धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

DC vs LSG, Playing 11 : संभाव्य प्लेईंग 11

LSG Playing 11 :  लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग 11

डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिली रोसो, रोवमन पॉवेल, मिचेल मार्श, सरफराज खान (विकेटकीपर), अक्षर पटेल, ललित यादव, मुकेश कुमार, कुलदीप यादव, चेतन सकारिया 

DC Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग 11

केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, क्रृणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, रवी बिश्नोई, मार्क वूड, आवेश खान, जयदेव उनादकट.

लाईव्ह सामना कुठे पाहाल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' अॅपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

KKR vs PBKS : धवन आणि नितीश या नव्या कर्णधारांमध्ये चुरशीची लढत; कशी असेल पंजाब आणि कोलकाताची प्लेईंग 11, जाणून घ्या पिच रिपोर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget