IPL 2023 Telecast : अंबानी फ्री मध्ये दाखवणार IPL सामने, मोजली मोठी रक्कम
Viacom Jio Cinema अॅपवर आयपीएलचे सामने मोफत पाहण्याची सोय मिळणार आहे.

IPL 2023 live Free Streaming : आयपीएलच्या (IPL) 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. बीसीसीआयने नुकतेच याचं वेळापत्रक जारी केले आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई या संघात पहिला सामना रंगणार आहे. प्रत्येक संघाने आयपीएलची तयारी सुरु केली आहे. यामध्ये ब्रॉडकॉस्टरही मागे नाहीत. यंदा जिओवर आयपीएलचे मोफत सामने पाहायला मिळणार आहेत. (IPL live streaming on Jio Cinema from March 31)
स्टार इंडियाकडे टीव्हीचे हक्क आहेत आणि Viacom18 कडे डिजिटल अधिकार आहेत. Viacom Jio Cinema अॅपवर 18 सामने ऑनलाइन प्रसारित करणार आहे. त्यांनी आयपीएलचे सामने मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रिलायन्स जिओने सांगितले की, युजर्स 4K रिझोल्यूशनमध्ये सामना पाहू शकतात. यापूर्वी आयपीएलच्या ऑनलाइन प्रसारणाचे अधिकार डिस्ने + हॉटस्टारकडे होते. त्या प्लॅटफॉर्मवर सामने पाहण्यासाठी वापरकर्त्यांना पैसे द्यावे लागत होते.
जिओच्या या निर्णायामुळे क्रीडा चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 31 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरु होणार आहे. आता आयपीएलचे सामने मोफत पाहायला मिळणार आहेत.
बीसीसीआयने आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केले आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे. 21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल. आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहे. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल 2023 चं आयोजन भारतातच होणार आहे. देशभरातील 12 मैदानावर सामने रंगणार आहेत. दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. अ ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे.
आयपीएलच्या सर्व संघाचे कर्णधार
सनरायजर्स हैदराबाद – एडन मारक्रम
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - फाफ डु प्लेसिस
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
कोलकाता नाइट रायडर्स- श्रेयस अय्यर
पंजाब किंग्स – शिखर धवन
दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत (दुखापतीमुळे यंदा दुसऱ्याकडे जबाबदारी जाऊ शकते)
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा
लखनौ सुपर जायंट्स- केएल राहुल
गुजरात टायटन्स- हार्दिक पांड्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
