(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : शाकिबच्या जागी KKR ने इंग्लंडच्या खेळाडूला घेतले, T20 मध्ये 6 शतके ठोकलीत
Jason Roy IPL 2023 : कोलकाता संघाने आयपीएलच्या सोळाव्या हंगमासाठी इंग्लंडच्या विस्फोटक फलंदाजाला संघात सामील केलेय.
Jason Roy IPL 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे शाकिब अल हसन याने आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. हा कोलकात्यासाठी मोठा धक्का होता. कोलकाता संघाने आयपीएलच्या सोळाव्या हंगमासाठी इंग्लंडच्या विस्फोटक फलंदाजाला संघात सामील केलेय. केकेआरने शाकिब हल हसनच्या जागी इंग्लंडच्या जेसन रॉय याला ताफ्यात घेतलेय. जेसन रॉय आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. रॉयने आतापर्यंत टी२० मध्ये सहा शतके झळकावली आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या मिनी लिलावात कोलकात्याने शाकिब अल हसन याला दीड कोटी रुपयांत खऱेदी केले होते. पण शाकिब अल हसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि वयक्तिक कारणामुळे आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याने शाकिबच्या जागी इंग्लंडच्या जेसन रॉय याला संघात सामील केलेय.
जेसन रॉयसोबत किती रुपयांचा करार ?
आयपीएल 2023 साठी केकेआरने जेसन रॉयसोबत 2.8 कोटी रुपयांचा करार केल आहे. जेसन रॉय याची बेस प्राइज दीड कोटी रुपये होती. कोलकात्याने जवळपास दुप्पट रक्कम देत जेसन रॉय याला ताफ्यात घेतलेय. जेसन रॉय इंग्लंडच्या तिन्ही फॉर्मेटचा सदस्य आहे. कसोटी, टी २० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा जेसन रॉयकडे मोठा अनुभव आहे.
🚨 NEWS 🚨@KKRiders sign Jason Roy.
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2023
Details 🔽 #TATAIPLhttps://t.co/ITiAoWl6R2
टी20 करिअरमध्ये सहा शतके -
जेसन रॉय याला आक्रमक खेळाडू म्हणून ओळखळे जाते. जेसन रॉय याने आतापर्यंत 313 टी २० सामने खेळले आहेत. यातील 307 डावात त्याने 27.77 च्या सरासरीने आणि 141.90 च्या स्ट्राइक रेटने 8110 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने सहा शतके आणि 53 अर्धशतक लगावली आहेत. नाबाद 145 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
जेसन रॉयचे आंतरराष्ट्रीय करिअर -
इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जेसन रॉय याने आतापर्यंत पाच कसोटी, 116 वनडे आणि 64 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत 187, वनडेमध्ये 4271 आणि टी20 1522 धावा चोपल्या आहेत.
पंजाबने गुरनूर सिंह बारसोबत केला करार
राज अंगद बावा दुखापतीमुळे यंदाच्या हंगमाला मुकणार आहे. पंजाबने त्याच्या जागी गुरनूर सिंह बार याच्यासोबत करार केला आहे. गुरनूर याच्यासोबत वीस लाख रुपयांचा करार झाला आहे. राज अंगद बावा खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार आहे.
आणखी वाचा :
मुंबई इंडियन्सच्या लेग स्पिनरला ब्रॅड हॉजने दिले फिरकीचे धडे, पाहा व्हिडीओ
IPL 2022 : 'चेज मास्टर' गुजरात, आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना फक्त मुंबईकडून पराभव