IPL 2022 : 'चेज मास्टर' गुजरात, आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना फक्त मुंबईकडून पराभव
IPL 2023 : आयपीएलमध्ये गुजरात संघाला चेज मास्टर म्हटल्यास वावगे वाटायला नको... कारण गुजरात संघ लक्षाचा पाठलाग करताना 90 टक्के यशस्वी ठरतोय.
IPL 2023 : आयपीएलमध्ये गुजरात संघाला चेज मास्टर म्हटल्यास वावगे वाटायला नको... कारण गुजरात संघ लक्षाचा पाठलाग करताना 90 टक्के यशस्वी ठरतोय. 2022 पासून गुजरातची विजयी घौडदोड सुरु आहे. गुजरातने लक्षाचा पाठलाग करताना 11 पैकी 10 वेळा विजय मिळवला आहे. फक्त मुंबईविरोधात गुजरातला लक्षाचा पाठलाग करताना अपयश आले आहे. गुजरातने चेन्नईविरोधोधात सर्वाधिक तीन वेळा यशस्वी लक्षाचा पाठलाग केलाय. लखनौ, पंजाब, हैदराबाद, आरसीबी, राजस्थान आणि दिल्ली या संघाविरोधात गुजरातने यशश्वी लक्षाचा पाठलाग केलाय.
2022 च्या हंगमात गुजरात संघ चषक जिंकेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने हा करिश्मा करुन दाखवला. गुजरातचा संघ चॅम्पियन होण्याचे कारण चेस मास्टर होय... कारण, गुजरातचा संघ अतिशय पद्धशीरपणे धावांचा पाठलाग करतो... प्रत्येक फलंदाज आपले काम चोख बजावतो... एकापेक्षा एक सरस फलंदाज गुजरातकडे आहेत. डेविड मिलर, राहुल तेवातिया आणि राशिद खान या तिघांनी गुजरातला जेच मास्टर करण्यात पटाईत आहेत.
गेल्या हंगमात गुजरातने नऊ वेळा डावाचा पाठलाग केला होता. यामध्ये त्यांनी आठ सामन्यात विजय मिळवला होता. यंदाच्या हंगमातील दोन्ही सामन्यात गुजरातने यशस्वी धावांचा पाठलाग केला. गुजरातला फक्त मुंबईविरोधात धावांचा पाठलाग करण्यात अपयश आलेय. आयपीएल 2022 मधील 51 व्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सहा विकेटच्या मोबदल्यात 176 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर गुजरातचा संघाला पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. या सामन्याचा अपवाद वगळता गुजरातने आतापर्यंत आयपीएलमध्ये यशस्वी रन चेज केले आहेत.
Gujarat Titans while Chasing in IPL
— Broken Cricket (@BrokenCricket) April 4, 2023
Won vs LSG
Won vs PBKS
Won vs CSK
Won vs SRH
Won vs RCB
Lost vs MI
Won vs CSK
Won vs RR
Won vs CSK
Won vs DC*
DC vs GT, Match Highlights : मोहम्मद शामी आणि राशिद खान यांच्या गोलंदाजीनंतर साई सुदर्शनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरवर गुजरातने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. दिल्लीने दिलेले 164 धावांचे आव्हान दिल्लीने सहा विकेट आणि 11 चेंडू राखून पार केले. गुजरातचा हा सलग दुसरा विजय होय... गुजरातने पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला होता. तर आज दिल्लीला आस्मान दाखवले. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव होय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे.