IPL 2023 : आयपीएल सामन्यांची धुमधाम आता देशभर, सामने पुन्हा Home-Away फॉर्मेटमध्ये, सौरव गांगुलीची माहिती
IPL : क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा म्हटलं तर इंडियन प्रिमीयर लीग. पण कोरोनामुळे मागील दोन वर्षे ही स्पर्धा नेहमीसारखी धडाकेबाज होत नसल्याचं दिसून आलं आहे.
IPL 2023, Home Away Format : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) या जगातील सर्वात मनोरंजनात्मक मालिकेच्या सामन्यांची प्रेक्षक वर्षभर वाट पाहत असतात. यंदाची आयपीएल 2022 (IPL 22) हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाने जिंकली. आता आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसंबधित एक नवी घोषणा बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguy) याने केली असून टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे आयपीएल नेहमीसारखी होत नव्हती, पण आता आयपीएल पुन्हा जुन्या ढंगात होणार आहे. ज्यामुळे आता प्रत्येक संघ आपले सात सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहे.
काय म्हणाला गांगुली?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ''पुरुषांच्या आयपीएलचा आगामी हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे 7 सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत. तसंच सध्या बीसीसीआय बहुप्रतिक्षित महिला आयपीएलवर काम करत आहे. आम्ही पुढच्या वर्षी पहिला हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे.”
कोरोनामुळे आयपीएल निर्बंधात
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच आयपीएल 2020 (IPL 2020) आधी कोरोनाचं संकट आलं ज्यामुळे आयपीएल 2020 चं आयोजन सप्टेंबरमध्ये यूएई (UAI) याठिकाणी झालं होतं. त्यानंतर आयपीएल 2021 (IPl 2021) स्पर्धेवेळी कोरोनाचा प्रभाव कमी झाला होता, त्यामुळे स्पर्धा भारतात सुरु झाली. पण पुन्हा कोरोनाचा (Corona Outbreak) धोका वाढल्याने अखेरचे सामने युएईमध्ये झाले. त्यानंतर आयपीएल 2022 स्पर्धा भारतातच पार पडली, पण मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि अहमदाबाद याच ठिकाणी सामने खेळवले गेले. पण आता आयपीएल 2023 चे सामने पूर्वीप्रमाणेच्या आयपीएल फॉर्मेटमध्ये होणार आहेत. ज्यामुळे आता प्रत्येक संघ आपले सात सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळेल.
हे देखील वाचा-